नाडॊली गावची सुरक्षा सुट्टीवर आलेल्या जवानांच्या हातात

मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - पाटण तालुक्यातील डेरवन येथे १० वर्षाचे लहान बाळ कोरोना पॉझिटिव्ह सापडले आणि पाटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या लहान बळावर उपचार करून त्याला कोरोना मुक्त करणे हे मोठे आव्हानं होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने अथक प्रयत्न करून या बाळाला कोरोना राक्षसापासून वाचवले आणि पाटण तालुका कोरोनामुक्त करून तालुक्याला मोकळा श्वास दिला. मात्र पाटण तालुक्यातील बनपूरी येथील ४३ वर्षीय कोरोना संशयीत महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संबधित प्रशासनाने त्या महिलेचे स्वँब नमुने घेतले आणि रिपोर्ट आल्यानंतर ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पुन्हा पाटण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हळूहळू शिरळ, कुंभारगाव, म्हावशी, बनपूरी, शितपवाडी, भालेकरवाडी, बाचोली, गावडेवाडी, खालकरवाडी, गलमेवाडी, म्हसोली व ढेबेवाडी अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव होताच पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पाटण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य सेवक, पोलिस, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामसुरक्षा कमेटी या सतर्क झाल्या असुन यांच्या मार्फत कोरोना बाधित असणाऱ्या गावांच्या सीमा सील केल्या जात आहेत. तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करून मगच आपल्या गावात प्रवेश दिला जात आहे.
पाटण तालुक्यातील नाडोली या गावाच्या सीमा मात्र गावात सुट्टीवर आलेल्या मिलिटरी जवानांनी घेतल्या असल्याचे दिसत आहे. या गावांत तब्बल 5 मिलिटरी जवान काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले आहेत. आपले गाव जरी सध्या निगेटिव्ह असले तरी या गावांत मुंबई हुन आलेली व्यक्तीचा नुकताच मृत्यू झाल्याने त्या व्यक्तीच्या संपर्कातील काहींचे स्वँब तपासणीसाठी घेतले आहेत. शिवाय गावात आणि गाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या गावात सुट्टीवर आलेल्या मिलिटरी फौजींनीच आपल्या गावासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एरव्ही हातात बंदूक घेऊन देशाच्या सीमेवर पहारा देऊन देशाचे रक्षण करणारे हे जवान आपल्याच गावाच्या सीमेवर हातात काठी घेऊन आणि तोंडाला मास्क बांधून गावाची सुरक्षा हातात घेतली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नाडोली गावातील मिलिटरी जवानांच्या या अनोख्या देशसेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या चार पाच दिवसांपासून बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे सध्या तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी त्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. लॉकडाऊन काळात अडकल्यामुळे त्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागले असुन त्यांच्याकडे घरी येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण कोरोना काळात आजच्या घडीला चौथा टप्पा सुरू होण्यापुर्वीच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती, जगायचं कस हाच त्यांच्यापुढे प्रश्न उभा होता. आणि आता तर चौथा टप्पा सुरू झाला आहे या चौथ्या टप्प्यात जर अडकले असते तर मग काय बोलूच नका काय झाल असत त्यांच हे विचार करायलाच नको. आपण जरी त्या ठिकाणी असतो तर हीच वेळ आपल्यावर आली असती त्यामुळे कोरोना आज आहे उद्या नाही त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांना सन्मानपूर्वकच वागणूक देणे गरजेचे आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा