एफ.आर.पी. साठी शेतकर्यांना सोबत घेऊन जन आंदोलन उभे करणार
शेतकर्यांचे पंचनामे करून हेक्टरी पाच हजार अति तातडीची मदत तात्काळ द्यावी
कारखान्यांची थकित एफ.आर.पी. पूर्ण करण्यासंदर्भात तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन
बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
कराड (प्रतिनिधी) - बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांची थकित एफ आर पी पूर्ण करण्यासंदर्भात तहसिलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.
गेली दोन ते तीन महिने सर्वजण कोरोना सारख्या रोगाविरूध्द लढा देत आहोत. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त नुकसान शेतकर्यांचे झाले आहे.उभ्या पिकात जनावरे सोडून द्यायची वेळ शेतकर्यांच्यावर आली असून उभी पिके बाजारपेठ नसल्यामुळे शेतातच पडून राहिलेली आहेत.त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकर्यांचे पंचनामे करून हेक्टरी पाच हजार अति तातडीची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.तसेच एफ.आर.पी.14 दिवसात देणे बंधनकारक असतानाही व तसा कायदा असतानाही अद्यापही एकाही कारखान्याने एफ आर पी पूर्ण केलेली नाही.जिल्हाधिकारीसाहेब तुम्ही कोरोना पसरू नये म्हणून जसे काम करताय तसेच काम शेतकर्यांची राहिलेली एफ आर पी पूर्ण करण्यासाठी करावी.साखर कारखानदारांना तात्काळ बिले जमा करण्यास भाग पाडावे. आता शेतकर्यांचा संयम संपला आहे, कोरोनाच्या आडून साखर कारखानदार जाणिवपूर्वक शेतकर्यांना बिले देण्यास विलंब करत आहेत. बळीराजा शेतकरी संघटना राहिलेली एफ आर पी साठी आता शेतकर्यांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन उभे करणार असून होणार्या परिणामास प्रशासन जबाबदार राहिल.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, अनिल घराळ, सुनिल कोळी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा