को.प. बंधाऱ्याच्या दुरुस्तीची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

कोणेगाव येथील भरावाचे काम पूर्ण झाले असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी 


         कराड (लक्ष्मीपुत्र) - गत वर्षी कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कोणेगाव (ता.कराड, जि. सातारा) येथील को.प.बंधाऱ्यात झाडे झुडपे अडकून बंधाऱ्याच्या उजव्या बाजूकडील जमीन वाहून गेली होती. सदर बंधाऱ्याच्या बाजूच्या भरावाचे काम पूर्ण झाले असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केली.
         यावेळी अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, उप अभियंता विलास पाटील, जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद मोरे, उप अभियंता आर.बी.भोसले, ठेकेदार विवेक शेलार आदी उपस्थित होते.
        नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, कार्यक्षेत्रातील शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या प्रयत्नाने १९९० च्या सुमारास को.प.बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर बंधारा देखभाल व दुरुस्तीसाठी  कृष्णा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित झालेपासून बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करता येतो. बंधाऱ्याच्या डाव्या बाजूस कठीण खडक उजव्या बाजूस असलेला खडक १०-१२ मीटर खोलीवर आहे.सन- २०१९/२० च्या पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे  कृष्णा नदीस महापूर आला व  नदीपात्राकडेची मोठमोठी झाडे पुराच्या पाण्याबरोबर वाहत येऊन को.प.बंधाऱ्यात अडकली व पूर मोठा असल्याने उजव्या बाजूच्या गाईड वॉल  लिकेच होऊन पात्र उजव्या बाजूला वाहून गेले तसेच उजव्या बाजूच्या भरावही काही प्रमाणात वाहून गेला होता.
          या बंधाऱ्यावर उंब्रज, वडोली भि., कोर्टी हनुमानवाडी कोणेगाव या गावांच्या पाणी पुरवठा योजना, लगतच्या शेतीसाठी लागणारे पाणी, कराड औद्योगिक वसाहतीसाठीचा पाणी पुरवठा केला जातो. बंधाऱ्याचा उजवा तिर वाहून गेल्यामुळे सदर बंधाऱ्यात पाणी साठा करणे शक्य न्हवते म्हणून तातडीने यांत्रिकी विभागाकडून सदर भरवाचे काम सुरू करण्याची विनंती केली असता पाटबंधारे खात्याने विलंब न लावता तातडीने लक्ष घालून अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे  काम पूर्ण केले आहे. या कामासाठी हनुमानवाडी तसेच नदीच्या दोन्ही बाजूच्या गावातील लोकांनी केलेल्या सहकार्याने हे काम पूर्ण झाल्याचे नामदार बाळासाहेब पाटील बोलत होते.
         यावेळी संपतराव जाधव, हंबीरराव जाधव, डी.बी.बापू, संग्रामसिह पलंगे, शिवाजीराव पाटील कोणेगावकर, सतीश चव्हाण, राजकुमार चव्हाण, हनुमानवाडीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.