वनरक्षक प्रकाश शिंदेंच्या प्रयत्नातून साकारले कृत्रिम पाणवठे

कोयनानगर लक्ष्मीपुत्र (युसूफ हकीम) - हेळवाक वनपरिक्षेत्र कार्यालयीन आवारात अनेक पक्षाची वरदळ, किलबिलहाट खूपच उत्साहात पाहायला मिळतो. परिसरात स्थानिक प्रजातीचे वृक्ष मोठ्याप्रमाणावर असल्याने अनेक पक्षाचे दर्शन ही नित्याची बाब आहे. प्रामुख्याने यामधे होला, ठीपकेवाला कवडा, कोकीळ, पाहाडी ताबट, माहाधनेश, पांढऱ्या भुवईचा धोबी, सातभाई, शिपाई बुलबुल, लालबुड्या बुलबुल, काळटोप कस्तूर, जांभळा सूर्य पक्षी आशा अनेक पक्षाचे वास्तव्य असणारा असा हेळवाक कार्यालयीन परिसर परंतु ऐन उन्हाळ्यात पशूपक्षांना वनातील तळे डबके कोरडी पडत जातात व तेथील पशुपक्ष्यांना मानवी वस्तीकडे वळायला लागत आहे.भविष्यासाठी ही धोक्याची सूचना असल्याचे संकेत मिळत आहेत.या अनुषंगाने हेळवाक कार्यालयीन आवारात नैसर्गिक दिसणारे दोन कृत्रिम पाणवठे वनरक्षक प्रकाश शिंदे यांनी स्वखर्चाने तयार केले आहेत.
क्रूत्रिम पाणवठ्यांबद्दल मार्गदर्शन करताना प्रकाश शिंदे म्हणाले, क्रूत्रिम पाणवठे तयार करण्यासाठी यामध्ये शेत तळ्यासाठी वापरला जाणारा २०० जी .एस .एम पॉलीथीन पेपर वापरला आहे. तसेच प्रत्येक पाणवठ्यामध्ये १०० ते ११० लिटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे हा पाणवठा बनविण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी वनक्षेत्रपाल अमित भोसले याचे मार्गदर्शन लाभले तसेच सहकाऱ्यांची ही मदत लाभली. तरी अशा प्रकारचे पाणवठे मानवीवस्तीमध्ये बनविणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. सध्या या प्रकारचे पाणवठे बनविण्यासाठी आम्ही पक्षीप्रेमींना मदतीला घेऊन एक नवीन संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. वनरक्षक प्रकाश शिंदे यांच्या प्रयत्नांचे सर्वस्तरातूण कौतुक होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा