खाकी वर्दीतला देव माणूस - नामदेव शिंदे
खाकी वर्दीतला देव माणूस - नामदेव शिंदे
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - खाकी वर्दीतला देव माणूस आपण आजपर्यंत ऐकत आलो होतो. पण ज्या ठिकाणी सेवा समाप्त झाले आहे त्याठिकाणी पाहणे हे दुर्मिळच म्हणावे लागेल. कारण पूर्वी हुपरी मध्ये सेवा बजावणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक व सध्या मुंबई क्राईम ब्रँच पोलीस निरीक्षक यांच्या पदावर कार्य करणारे श्री नामदेव शिंदे यांनी हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2017 -18 यावर्षी हुपरी परिसरात सिंघम नावाने परिचित झालेले व प्रत्येक बेजबाबदार व अवैध्य व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस वटणीस आणणारे गोरगरिबांचा दाता असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची एक आगळीवेगळी वचक पंचक्रोशी मध्ये निर्माण झाली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत दिनांक 7/5/2017 रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरेश लक्ष्मण कांबळे (रा. शाहूनगर) यांनी त्यांच्या बद्दल गीत रचना करून हुपरी पोलीस ठाण्यात सादर केले होते. तीन वर्षांनी हया घटनेला पुन्हा उजाळा मिळाला व साहेबांनी थेट कांबळे यांची विचारपूस करीत असताना समजले की दहा वर्ष घरांमध्ये त्यांच्या लाईटच नाही याची दखल घेत श्री नामदेव शिंदे यांनी तात्काळ सेक्युरिटीसर्विस विक्रमसिंह घाटगे यांना यासंदर्भात माहिती देत तात्काळ या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार चार ते पाच दिवस धडपडून घाटगे यांनी सौभाग्य योजना 100 पर्यंत युनिट मोफत या अनुषंगाने अंधांसाठी लाभ मिळवून दिले आहे. ते ही पूर्णतः मोफत तसेच फिटिंग वायर हे मोफत देण्यात आले आहे.
यावेळी श्री कांबळे यांनी आपल्या मनोगतात पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, विक्रमसिंह घाटगे, तसेच हुपरी महावितरणचे आभार मानत डोळ्यान अंध असलो तरी मनाने वर्दीतला देव पाहत आहे असे उध्दगार त्यांनी काढले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा