वीर सेवा दल हुपरीच्यावतीने जनावरांच्यासाठी लसीकरण शिबीर

वीर सेवा दल हुपरीच्यावतीने जनावरांच्यासाठी लसीकरण शिबीर


            हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - वीर सेवा दल हुपरी व पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही घटसर्प आणि ठरल्या लसीकरण शिबिर संपन्न झाले.
           हुपरीमधील अंबिका नगर, गंगानगर या पूर ग्रस्थ भागातील पशुपालक लोकांनी या शिबिरात भाग घेतला. कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे टप्याटप्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरग्रस्थ भागातील प्रत्येक पशुपालकाच्या गोट्यावर प्रत्यक्ष जाऊन जनावरांना लसीकरण केले. पहिल्या टप्प्यात 302 जनावरांना लस देण्यात आली.
           लोकांनी शिबिरात उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. शिबिरात पशुवैद्यकीय दवाखान्याचे सौ.डॉ. अनिता कदम यांनी जनावरांची तपासणी करून मार्गदर्शन केले.यावेळी प्रांत प्रमूख अजित पाटील, संघनायक अभिनंदन सौंदत्ते, उपसंघनायक सुनील गाट , बाहुबली नेमीनाथ गाट, सतीश पाटील, अजित (बंडू) पाटील, अभिनंदन पाटील, आशिष मायगोंड,शितल चौगले, अभिजीत पाटील, विशाल बुकशेट, दिपक गाट, प्रणव पलसे, अमर इंग्रोळे, सतीश झोले, बाहुबली ना. गाट, श्रेणीक गाट याबरोबर दावाखान्यातील कर्मचारी किरण कांबळे, राजू पवार, आकाश गागडे, राहुल नगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच वीर सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.