आषाढी वारी पालखी सोहळा २०२० समन्वय बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न

सातारा जिल्ह्याच्या व्हिडीओ कॉन्फ्रान्सद्वारे बैठकीस सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील सहभागी


          कराड (लक्ष्मीपुत्र) - सद्य स्थितीमध्ये कोरोना (कोविड 19 ) संसर्गजन्य परिस्थिती विचारात घेऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा कशाप्रकारे योग्य त्या  प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह पार पाडता येईल याबाबत बैठक उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन पुणे येथे, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक व्हिडिओ कॉन्फ्रान्सद्वारे पार पडली.
          जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथून प्रस्तुत बैठकीस राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व इतर पदाधिकारी व्हिडीओ कॉन्फ्रान्सद्वारे  सहभागी होते.
           सदर बैठकीस सोलापूर चे मा.पालकमंत्री, तसेच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संबंधित पालखी सोहळा पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.