कमाई नको पण भुकेलेनच्या तोंडाचा घास होऊयात

किल्ले मोरगिरी येथील शेतकरी अशोक अवघडे यांनी लॉकडाऊनमध्ये आपल्या शेतातील गोरगरिबांना वाटली दोन टन भाजी मोफत
               मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - लॉकडाऊनमध्ये सर्व स्तरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी. मात्र यामध्ये सर्वांच्या हाकेला खंबीर उभा आहे. याकाळात अनेक शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशा संकटामध्ये न डगमगता पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी येथील शेतकरी अशोक अवघडे यांनी आपल्या शेतात पिकलेला दोन टन भाजीपाला परिसरातील गोरगरीब जनतेसह कोरोनाच्या युद्धात 24 तास तत्पर असलेले पोलिस जवान, महसूल विभागाचे  कर्मचारी, आरोग्य रक्षकांना, मोफत देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
            किल्ले मोरगिरी मधील अशोक अवघडे हे मुंबई येथे स्वतः व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. परंतु गेल्या तीन ते चार वर्षात त्यांनी आपल्या गावाजीक शेतजमीन घेऊन त्यामध्ये शेतमाल पिकवण्यात सुरुवात केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे  अनेक व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेले आहेत.  जगाचा पोशिंदा शेतकरी, मात्र सर्वांसाठी कंबर कसून उभा आहे. परंतु काही ठिकाणी हवालदिल होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावरती ट्रॅक्टर, जेसीबी,  फिरवून शेतमाल उद्ध्वस्त केलेले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडिओ, टीव्ही, वृत्तपत्रांच्या माध्यमातून पाहत आहोत. परंतु किल्ले मोरगिरी मधील अशोक अवघडे या शेतकरी आपल्या शेतातील दोन टन भाजीपाला यासह वांगी, टोमॅटो, काकडी, ढबु, मिरची, दोडक आधी शेतमाल काढून तो गोरगरीब व काही गरजू लोकांना वितरीत केला. हे वितरण करताना कसलाही गाजावाजा नाही, कोणतीही जाहिरातबाजी नाही. अशोक अवघडे यांनी आपण स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांना भाजी पाल्याचे मोफत वाटप केले.
              त्यांच्याशी दैनिक लक्ष्मीपुत्रचे प्रतिनिधी दीपक मांडगावकर यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वजण हतबल आहेत. मात्र शेतमाल उद्ध्वस्त करण्यापेक्षा एखाद्या भुकेलेल्या मुखी गेला तर त्याहीपेक्षा दुसरे भाग्य नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये जीत जायेंगे हम, लेकिन साथ हो तुम्हारी अशी त्यांनी शेरेबाजी केली. त्यांच्या या उपक्रमाचे पाटण तालुक्यातील तोंडभरून कौतुक होत आहे. तर अशोक अवघडे शेतकऱ्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन शेतातील शेतमाल खराब न करता गोरे गोरगरिबांच्या मुखात घालावा असे आवर्जून सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.