मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडींचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांचा पाटण तालुकाही जपतोय सामाजिक बांधिलकी

मराठा महासंघाचे संस्थापक, माथाडींचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांचा पाटण तालुकाही जपतोय सामाजिक बांधिलकी
              पाटण (लक्ष्मीपुत्र) - कोरोनोसारख्या महाभयंकर आजाराने संपूर्ण जग संकटात आहे.आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनोने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत अनेक व्यावसायिक घडवले.आज तेच व्यावसायिक संकटसमयी सर्वसामान्यांच्यासाठी देवदूत ठरताहेत...
              अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष श्री. संजय पवार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यामध्ये तरुण व्यावसायिक घडत आहेत. याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील महामंडळाचे लाभार्थी श्री. दिपक मांडावकर (9923734428 रा. तामकडे, ता. पाटण) यांचा सोहम मोबाईल शॉपी नावाचा व्यवसाय आहे. त्यांनी पाटण शहरातील पोलीस अधिकारी, सरकारी कर्मचारी तसेच समाजातील गरजू लोकांना मास्क तसेच नाष्टा यांचे वाटप केले. त्यांनी केलेले समाजोपयोगी कार्य नक्कीच प्रशंसनीय आहे.
           याअगोदर पाटण तालुक्यातील महामंडळाचे लाभार्थी श्री. सुहास मोरे (9765939994 रा. सूर्यवंशिवाडी, ता. पाटण) या शेतकरी व्यावसायिकाने देखील मोफत दूध वाटून मदत केली आहे.
               या देशावर आलेल्या कोरोनोच्या संकटांमध्ये मराठा समाजातील तरुणांनी संकटसमयी केलेली मदत म्हणजे एकप्रकारे स्वर्गीय अण्णासाहेबांच्याप्रति एक आदरांजलीच आहे.

  तुषार उर्फ गणेश पाटील
            (सातारा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.