सह्याद्रि हॉस्पिटल मधून पहिल्या सहा कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज
कोरोना वॉरियर्स डॉक्टरांच्याहस्ते रुग्णांचा सन्मान
कराड (लक्ष्मीपुत्र) - सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथून गुरुवारी सहा कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.सह्याद्रि हॉस्पिटल च्या सर्व स्टाफ ने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. सहा रुणांपैकी १ रुग्ण हा वनवासमाची येथील दहा वर्षांचा मुलगा असून उर्वरित पाच रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालय कराड येथील महिला कर्मचारी आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचारादरम्यान या महिला कर्मचारी संक्रमित झालेल्या होत्या. या सर्व सहा रुग्णांचे तपासणी अहवाल नेगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संगीत देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ आर जी काटकर, डॉ सुनील कोरगु, सह्याद्रि हॉस्पिटलचे कामकाज अधिकारी डॉ वेंकटेश मुळे, संचालक अमित चव्हाण व सहाय्यक व्यवस्थापक विश्वजीत डुबल आदी उपस्थित होते.
सह्याद्रि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल कराड चे कामकाज प्रमुख डॉ. वेंकटेश मुळे म्हणाले की, “प्रभावी संसर्ग नियंत्रणासाठी कठोर निर्जंतुकीकरण, स्वछता, पीपीई किटचा वापर, कर्मचाऱ्यांचे सतत प्रशिक्षण याद्वारे सर्वोच्च गुणवत्तेसह आमची सेवा चालू आह “सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथील एक संपूर्ण इमारत कोविड -१९ रुग्णांसाठी समर्पित करण्यात आली असून येथे ५० बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. सह्याद्रि हॉस्पिटलने कोरोना वॉरियर्स ची टिम तयार केली असून त्यामध्ये अनुभवी डॉक्टर्स व कुशल नर्सिंग स्टाफ यांचा समावेश असून हे कोरोना वॉरियर्स कोविड-१९ बिल्डिंगमध्ये २४ X ७ रुग्णसेवेत कार्यरत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड चे संचालक मा. अमित चव्हाण म्हणाले कि, “आमच्या स्वतंत्र कोविड -१९ विभागाचे नियंत्रण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ३१ कोरोना बाधित पेशन्ट हे सह्याद्रि हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित केले होते त्या पैकी आज सहा रुग्ण कोरोनमुक्त झाले व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा