लायब्ररी चौक ते झेंडा चौक (पेठ) येथे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड

लायब्ररी चौक ते झेंडा चौक (पेठ) येथे ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड


            मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दीपक मांडावकर) - सध्या पाटण तालुक्यात एकही रुग्ण नसल्याने पाटण शहर वगळता तालुक्यात अन्य ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
           पाटण शहर, शहरी विभागात समाविष्ट असल्याने येथे केवळ अत्यावश्यक सेवा मर्यादित वेळेत सुरू राहणार आहेत. परंतु चापोली रोड ते जुना स्टँड अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने लॉकडाऊन चालू झाल्यापासून बंद आहेत. पण पेठेथील भरपूर दुकानदार गिर्‍हाईकांना बोलवून माल विकत आहेत.अनेक दुकानदारांनी इलेक्ट्रिक फॅन, इस्त्री, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, स्टेशनरीचे साहित्य शूज, विकत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. झेंडा चौक बंद केल्यामुळे त्या चौकापासुन वरती असणाऱ्या दुकानदारांकडे प्रशासनाचे लक्ष जात नसल्याचा फायदा घेऊन हे दुकानदार माल विकत आहेत.देश संकटात असताना दुकानदार त्या मालाची जादा दराने विक्री करत असून प्रशासाने याची दखल घेऊन लॉकडाउनचा फायदा घेत जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन दुकाने बंद करावीत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.