सी.पी.आर. मधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू

हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - हातकणंगले तालुक्याती रेंदाळ येथील महेश ऊर्फ संभाजी सुभेदार ( वय ३२ ) या तरुणास शुक्रवारी सायंकाळी सर्पदंश झाला.
दरम्यान ऊपचारासाठी हुपरी व तेथून कोल्हापूर येथील सी.पी.आर. मध्ये घेवून गेले असता विषारी सर्पदंश होऊनही काळजीपूर्वक ऊपचार केले नसल्याने जीव गमवावा लागला आहे. ऊपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे रोजंदारी करणाऱ्या युवकाचे कुटुंब ऊघड्यावर पडले असून त्याचे १० व १२ वर्षाची मुले व वृद्ध आई असे कुटुंब आहे. सी.पी.आर. रुग्णालयात हुपरी आरोग्य केंद्राच्या सल्ल्या नुसार दाखल केले .सी.पी.आर. येथील महिला वैद्यकिय अधिकारी यांना दंश झालेला सर्प विषारी असून रुग्णावर तातडीने ऊपचार करणेची विनंती नातेवाईकांनी केली. सोबत दंश केलेला मृतसर्प सोबत आणून तो नाग सर्प असलेचे विनवनी करत असतानाही वैद्यकिय अधिकारी यांनी दंश झालेला सर्प विषारी नाही, काळजी करनेचे कारण नाही असे सांगत जुजबी ऊपचार करून अवध्या दीड तासात डिसचार्ज दिला.
यावेळी अमृत संभाजी यांचे नातेवाईक यांनी निदान एक दिवस तर वैद्यकिय निरीक्षणा खाली इथे राहू दे, अशी विनंती केली असता ऊपचार करणाऱ्या महिला अधिकारी यांनी संबधीतांना इथे कोरोनाचे रुग्ण आहेत, तुमच्या पेशंटला कोरोनाची बाधा झाली तर आम्ही जबाबदार नाही, हा सर्प विषारी नाही, तुम्ही रुग्णास घरी घेवून जा असा सल्ला दिला. दरम्यान या सर्पदंश झालेल्या मृत संभाजी सुभेदार यास नाईलाजास्तव घरी घेवून जावे लागले. पेशंटला घरी घेऊन जाताच घराजवळ त्यास भोवळ येवून तो तेथेच खाली पडला, आणि तो कायमचाच पडला. नातेवाईकांनी परत रुग्णवाहिकेतून सी.पी.आर. कोल्हापूर येथे हलवले. मात्र इथे त्यांना ऊपचारा ऐवजी शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात घेनेची दुदैवी वेळ आली.
शासन गोर-गरीब जनतेसाठी लाखो रुपये खर्च करतआहे. मात्र यंत्रणेच्या बेफिकीर कारभाराने त्याचा लाभ दूरच घरातील कर्ता सवरता माणूस गमावणेची वेळ येत आहे. तर या भूमी ही न रोजंदारी करणाऱ्या संभाजीचा संसार ऊघडयावर आला आहे. त्याची वृद्ध आई १३ वर्षाची मुलगी व १० वर्षाचा मुलगा यांचा घरकर्ता ऊपचारातील हेळसांडीने गमवणेची वेळ या कुटुंबावर आली आहे. मायबाप सरकार अशा बेफिकिर यंत्रणेला धडा शिकवनार का? अशी चर्चा नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
देवदूत असणारे डॉक्टर सुभेदार कुटुंबियासाठी यमदूत ठरले आहेत एवढे नक्की .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा