सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे ५१ लाख रुपयेचा धनादेश सुपूर्त

ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्यावतीने मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी मदत


       कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ५१ लाख रुपयांचा धनादेश नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.
       कोरोना (कोविड १९)विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला असून सरकारच्या उत्पन्नच्या स्रोतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांमार्फत व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे ज्ञानदीप को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी ५१ लाख हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. संचालक जिजाबा पवार, सचिव चंद्रकांत ढमाळ, मुख्य व्यवस्थापक रामदास लिलीगे, सहकार मंत्री यांचे खासगी सचिव संतोष पाटील  उपस्थित होते.
      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे.  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक, व्यवसायिक संघटना व व्यक्तिगत दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.