वादळामुळे बीपी येथे जनावरांच्या शेडचे लाखोंचे नुकसान
वादळामुळे बीपी येथे जनावरांच्या शेडचे लाखोंचे नुकसान
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - जोरदार वाऱ्यासह पडलेल्या वळीवाचा पावसाचा तडाखा पाटण तालुक्याला बसला असून घरे, आंबा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.पाटण तालुक्यात बुधवारी दुपारी अचानक ढग दाटून आले. जोरदार वारे ढगांचा गडगडाटात जोरदार पाऊस सुरुवात झाली. आणि अचानकपणे आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
जोरदार चक्रीवादळामुळे बीबी (ता.पाटण) येथील आनंदराव पांडुरंग जाधव यांच्या जनावरांच्या शेडचे छत उडून गेले असून शेडचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बीबी (ता. पाटण) येथील सर्वसामान्य कुटुंबातील आनंदराव जाधव हे पारंपारिक शेती सह जोडधंदा म्हणून म्हैश पालन करतात. यासाठी त्यांनी कर्ज काढून मोठे शेड बांधले होते. त्यांच्याकडे मैसाना जातीच्या वीस म्हैशी आहेत. म्हैशी दुग्धव्यवसाय वरचा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. तर बुधवारी झालेल्या वादळी वाऱयासह पावसाने जनावरांचे शेडची छत उडून जाऊन गोठ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच बीबी येथील ग्रामस्थांनी शेळके शेडकडे धाव घेऊन पाहणी केली. शेडचे मोठे नुकसान झाल्याने जाधव कुटुंबीय हवालदिल झाले असून सदर नुकसानग्रस्त कुटुंबास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा