दोन हाना पण गावचा अढानी पुढारी म्हणा अशी गत ग्रामीण भागात झाली आहे : जिल्हाध्यक्ष विकास कदम
कोरोना काळात मुंबई, पुणे व जिल्ह्याबाहेरून आपल्या मुळ गावी येणाऱ्यांना त्रास देऊ नका
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - महाराष्ट्र राज्य सैनिकी विद्यार्थी सेना, सातारा जिल्हाध्यक्ष मा. विकास कदम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना विकास कदम म्हणाले कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी म्हणजे लॉकडाऊन चालू केला आहे. केंद्र व राज्य सरकारने चौथा लॉकडाऊन चालू करण्यापूर्वी मुंबई पुणे व राज्याबाहेर लॉकडाऊन काळात अडकलेल्यांना आपल्या मुळगावी जाण्यासाठी उपाय योजना करून त्या यशस्वीरित्या पार ही पडल्या त्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे महाराष्ट्र राज्य सैनिकी विद्यार्थी सेना आभारी असुन या निर्णयाचे सर्व स्तरातुन कौतुक होतं आहे. कारण लॉकडाऊन काळात खायच काय जगायचं कस हा प्रश्न सर्वांना पडला होता. ते पुढे म्हणाले संबधीत प्रशासनाच्या अध्यादेशाचे पालन करत मुंबई पुणे कर व राज्याबाहेरून येणारे लोक आपल्या मुळ गावी आल्यावर शासनाचे तंतोतंत पालन करत काही जण कुटुंबापासून अलगीकरन होतं आहेत शाळा, समाज मंदिर तसेच गावचे सभागृह यामध्ये १४ दिवसासाठी होमकॉरंटाइन होतं आहेत तर काही जण आपल्या घरातच होमकॉरंटाइन होतं आहेत.
मतदान आले की मुंबई पुणेकर, गावच काय काम असेल तर मुंबई पुणेकर, एखादा सन किंवा शुभ कार्य असेल तेव्हा मुंबई पुणेकर मग काय भरघोस अशी पैशाची मदत ठरलेलीच असते ते घ्यायला काही टगे तयारच असतात पुढे. मात्र सध्या कोरोनाने जगभरात उच्छांड मांडला असुन मुंबई पुणे व जिल्ह्याबाहेर असणाऱ्या कामानिमित्त बाहेर गेलेल्यांवर कोरोना आणीबाणी काळात लॉकडाऊनचे तीन टप्पे सहन करावे लागले. कोरोना काळात लॉकडाऊमध्ये अडकल्याने त्यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे, जगायचं कस हाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पण लॉकडाऊन काळात चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी मुंबई पुणे व बाहेर राज्यात अडकलेल्यांना आपल्या मुळ गावी सोडण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन लॉकडाऊन मध्ये अडकलेल्यांना दिलासा दिला खरा पण त्यांना काय माहिती गावचे अडाणी पुढारी ( टगे ) अशी वागणूक देतील. काही ठिकाणी आपल्या मुळ गावी आल्यावर त्यांना वेगळीच वागणूक मिळत आहे. गाव पुढारी त्यांना त्रास देत आहेत. राजकारण करत आहेत काही ठिकाणी तर वाळीत टाकण्याचे प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी गावचा अडाणी पुढारी तर शासनाच्या आदेशाला केराची टोपी दाखवत मुंबई पुणे करांवर अन्याय करत आहेत. असे प्रकार आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा , महाराष्ट्र राज्य सैनिकी विद्यार्थी सेना मुंबई पुणेकर व बाहेरून आपल्या मुळ गावी येणाऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिल. व अशे प्रकार करणाऱ्यावर कायद्याचा आधार घेऊन वेळ पडल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याच्या भूमिकेत सुध्दा जाऊ असेही जिल्हाध्यक्ष मा.विकास कदम म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा