शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याबरोबर व्हिडिओ काॅन्फरसव्दारे संवाद

शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याबरोबर व्हिडिओ काॅन्फरसव्दारे संवाद


           हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्पूण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत गावा गावांतील प्रमुख ठिकाणी हात धुण्यासाठी हॅन्ड वाॅश स्पाॅटस ( हॅन्ड वाॅश किओस्क ) ची संकल्पना राबवावी. तसेच राज्यातील सर्व कामगारांचे संसार उभे करण्यासाठी मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेतून ग्रामीण रुग्णालय, शाळा, सामाजिक दृष्ट्या उपयोगी ठिकाणे उभी करण्यासाठी कामे हातात घेणे विषयी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या कडे ( व्हिडिओ काॅन्फरस ) व्दारे संवाद करताना केली आहे.
           शिवसेना हुपरी शहर कार्यालयातून संवाद साधताना पुढे म्हणाले, जनतेसाठी नव्या हेल्थ पॉलिसीची उभारणी करावी, मुंबई व पुणे येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या भाजीपाला बास्केट घरपोच योजनेची राज्यात सुरूवात करावी, कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापुरी चप्पल, यञमाग व्यवसाय, हुपरीसह परिसरातील चांदी हस्तकला व्यवसाय तसेच इतर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, याच बरोबर पावसाळ्याचा धोका पाहता कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे करण्यासंदर्भात केन्द्र शासनाकडे पाठपुरावा करावा. अश्या मागण्या केल्या. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख विनायक विभूते, शहर प्रमुख अमोल देशपांडे, शहर संघटिका मीना जाधव, शिवसेना पक्षप्रतोद बाळासाहेब मुधाळे, नगरसेविका पुनम पाटील, अर्जुन जाधव, राजेंद्र पाटील, महेश माटके, किरण कुभांर, सुनिल सागयडेकर आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.