राष्ट्रवादीतर्फे डाॅक्टर्सना फेस शिल्ड, एन 95 मास्कचे वाटप - सत्यजितसिंह पाटणकर

 राष्ट्रवादीतर्फे डाॅक्टर्सना फेस शिल्ड, एन 95 मास्कचे वाटप - सत्यजितसिंह पाटणकर


               पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - पाटण विधानसभा मतदारसंघात कोरोना महामारीविरूद्ध सर्वच यंत्रणानी केलेल्या कार्याला निश्चितच सार्वत्रिक सलाम आहे. या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देताना त्यांच्यासाठी यथाशक्ती जे जे शक्य आहे ते ते करण्याचा व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच पुढाकार राहीला आहे. देशाचे नेते खा. शरद पवार व राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपली वाटचाल सुरू आहे. येथून कोरोना हद्दपार होईपर्यंत या सर्वच यंत्रणाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.
               कोरोना महामारीत महत्वाचे योगदान व भुमिका बजावणाऱ्या डाॅक्टर्सना विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मास्क शिल्ड व एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
               यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डाॅ. पी. एच. चव्हाण, डाॅ. एन. एन. खोत, डाॅ. बी. बी. पाटील, डाॅ. विलासराव रणनवरे, डाॅ. सुहास देशमुख, डाॅ. राजाराम पानस्कर, डाॅ. बाबासाहेब सावंत,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
              यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले कोरोनाच्या या युद्धात पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठीच त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. या मंडळींना मानसिक, शासकीय व प्रशासकीय पाठबळ आपण दिले आहे. लाॅकडाउनच्या काळात पोलिसांना सशक्त रहाण्यासाठी सकाळी दुध, दुपारी ऊन्हाळ्यात लस्सीचे दैनंदिन वाटप करण्यात आले. महसूल ,पोलीस, पंचायत समिती यंत्रणा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, पोलीस पाटील आदींसाठी दोन हजार बाटल्या सॅनीटायझर, पत्रकारांना धान्याची किट, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून गोरगरीब व मजुरांना अन्नधान्य वितरण करण्यात आले. याशिवाय वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅक्टर्सना फेस शिल्ड व एन 95 मास्कचे वाटप केले आहे. सामाजिक कृतज्ञता म्हणून या गोष्टी करत असताना समाजातील सर्वच घटकांनी या कोरोना चळवळीत सामील होवून स्वतःसह कुटुंबीय , समाज व गावांची काळजी घ्यावी .
           डाॅ. प्रल्हाद चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रामुख्याने येथे आमचे नेते विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून इतरांच्या जीवासाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम यातून जपलेली सामाजिक बांधिलकी याचा आम्हाला अभिमान आहे.
            यावेळी डाॅ. रघुनाथ नांगरे, डाॅ. मुल्ला, डाॅ. जाधव, डाॅ. विजय साठे, डाॅ. चंद्रकांत सुर्यवंशी, डाॅ. अमोल सुर्यवंशी आदी मान्यवर डाॅक्टर्स उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.