सत्यजितसिंह पाटणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी

पाटणमध्ये कार्यकर्त्यांचा नेत्यांसाठी एक आगळावेगळा उपक्रम

           पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - कोरोना महामारीमुळे सध्या सर्वत्र 'लॉकडाऊन' आहे. यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा ४ मे रोजी असणारा वाढदिवस साजरा करण्यात आला नाही. परंतु सत्यजितसिंह यांचे कट्टर युवा कार्यकर्ते विवेकराज गजानन मोहोळकर (मोरगिरी) यांनी या दिवशी पाटण शहरातील सर्व शिवभोजन केंद्रामध्ये लोकांसाठी मोफत भोजनाची सोय करुन एका चांगल्या सामाजिक कार्याद्वारे आपल्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
              असे म्हणतात, "अन्न दान हेच सर्वश्रेष्ठ दान" आहे. चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब लोकांचा रोजगार बंद झाला आहे. लोकांवर उपासमरीची वेळी आली आहे. अशा भुकेलेल्या लोकांच्या मुखात चार घास जाणे याच खऱ्या आपल्या नेत्याला शुभेच्छा ठरतील या भावनेतून विवेकराज यांनी हा अगळावेगळा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे सत्यजितसिंह पाटणकर यांनीही कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.