पाटण तालुक्यात टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्स द्वारे तपासणी
नाडोली ग्रामपंचायतीमध्ये 3 मशीन दाखल
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशिन्स मुळे ग्रामिण भागात टेम्परेचर तपासणी वस्तुनिष्ठ होऊ लागली असल्याने आरोग्य सेवकांशी आतापर्यंत खोटे बोलणारांचे आता पितळ उघडे पडू लागले आहे.
दरम्यान पाटण तालुक्यात सध्या ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अशा मशिन्स गावोगावी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेविका आणि अंगणवाडी सेविका ज्यावेळी प्रत्येकाच्या घरी जाऊन आरोग्याची माहिती घेतात तेव्हा बऱ्याच वेळा ताप असताना ही आरोग्य कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली जाते. मात्र त्याचवेळी खाजगी दवाखान्यातून संबंधित रुग्णाची नोंद होते. त्यामुळे शासनाला रुग्णासंबंधी वस्तुस्थिती समोर येत नाही, परिणामी कोरोनाच्या संदर्भातील लक्षणांची योग्य चाचणी होत नाही.
त्यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्या आर्थिक निधीतून अशा प्रकारच्या टेम्परेचर डिटेक्टिव्ह आणि सिपीओ टू या मशीनच्या खरेदी करण्यासाठी परवानगी दिली असून अद्याप ही पाटण तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीने ही मशीन खरेदी केली नाहीत. मात्र काही ग्रामपंचायतींनी अशा मशिन्स खरेदी केल्या असल्यामुळे त्या गावांतील रुग्णांची चांगल्या प्रकारे टेम्परेचार तपासणी सुरू झाली आहे. तालुक्यातील नाडोली या ग्रामपंचायतीने अशा प्रकारच्या 3 मशिन्स खरेदी केल्या आहेत. तर नुकतेच पुणे येथील देवदूत डिजीटल्स पेमेंट्स या संस्थेकडून मल्हारपेठ आरोग्य केंद्राला टेम्परेचर डिटेक्टिव्ह मशीन देण्यात आली आहे. आता संबंधित गावांत आरोग्य सेविका यांच्याकडून या मशीन द्वारे प्रत्येक संशयित व्यक्तीचे घराघरात जाऊन टेम्परेचर तपासणी आणि श्वसनाचे ठोके तपासणी सुरू झाली आहे.
दरम्यान मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राला पुणे येथील देवदूत डिजीटल्स पेमेंट्स या संस्थेकडून टेम्परेचार मशीन चे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.आर.पाटील, जगदीश शिंदे, वैभव पाटील, पोलीस पाटील, निलेश पाटील, आरोग्य सेवक अमित जाधव, जीवन देसाई, विश्वास साळुंखे, पत्रकार संभाजी भिसे, रुपेश जाधव यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा