यशवंत बँक आयोजित रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद


यशवंत बँक नेहमीच सामाजिक उपक्रमात आघाडीवर 



          कराड (लक्ष्मीपुत्र) - यशवंत बँक नेहमीच सामाजिक उपक्रमात आघाडीवर असते. लॉकडाऊनमुळे सध्या सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. यासाठी यशवंत बँकेने कराडमधील यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेच्या सहकार्याने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
          बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, संचालक प्रा.श्रीकृष्ण जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय डोईफोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मोकाशी, उद्योजक मुकुंद चरेगांवकर, माजी नगरसेवक घन:श्याम पेंढारकर, नितीन वास्के किरण मुळे समाधान चव्हाण सातिश देशमुखा यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले.
         बँकेचे सेवक, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजकांसह ४० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराचा लाभ घेतला.या उपक्रमाबद्दल समाजातील सर्व स्तरातून यशवंत बँकेचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.