न्युज पेपर्स असोशिएशनच्या राज्य कार्यकारीणीची बैठक पुणे येथे संपन्न 17 मे 2018 ला संघटनेचे राज्य अधिवेशन पंढरपूर येथे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुणे - असोसिएशन ऑफ स्माॅल मिडीयम न्युज पेपर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक राज्य अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरीचिंचवड महानगर पालीका भवनातील पञकार कक्ष येथे संपन्न झाली.मान्यवरांचे स्वागत पुणे जिल्हा अध्यक्ष सतीशश्चंद्र जकाते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा यशवंत गायकवाड , शशीकांत डांगे, यानी केले. बैठकीच्या प्रारंभी आचार्य बाळशास्ञी जांभेकर व कै. भा.वी.कांबळे (पञकार ) यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर पुणे येथील जेष्ठ पञकार कै.विनोद कूलकर्णी याना दोन मिनीटे स्तब्ध ऊभे राहुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
मागील सभेचे प्रोसोडींगचे वाचन राज्य महासचिव प्रदीप कुलकर्णी यानी केले.
ईम्पाल येथे दि 14 जानेवारी रोजी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयाची माहिती राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे यानी दिली.दि.8 ऑगस्ट 2017 व 16 नोव्हेंबर 2017 रोजी संघटनेच्या वतीने राबविलेल्या निवेदन अभियानाची माहिती सर्व सदस्यांनी बैठकीत दिली व पुन्हा असेच निवेदन अभियान बाळशास्ञी जांभेकर यांच्या जयंती दिनी म्हणजेच 20/2/2018 रोजी राबविण्याचे ठरले.,जाहिरात धोरण 2001च्या अंमलबजावणी संदर्भात झालेल्या कार्यशाळेची माहिती राज्य अध्यक्ष अप्पासाहेब पाटील यानी दिली व राज्यातील सर्व विभागात अशा कार्यशाळा आयोजित करण्यासाठी संचालक, ऊपसंचालक यांचेशी संपर्क साधण्यात येईल असे सांगितले.
दर्शनी जाहिरात देताना महाराष्ट्र शासनाकडुन होत असलेल्या अन्याया बाबत चर्चा झाली व सर्व वर्गातील वृत्तपत्रांना समन्यायी पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.,जाहिरात दरवाढीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. शासनाने 200 टक्के जाहिरात दर वाढ द्यावी.सार्वजनिक बांधकाम खात्याने वेगळे परिपञक काढून साप्ताहिकाच्या जाहिराती बंद केल्या आहेत. त्या पुर्ववत सुरु कराव्यात,नगर परिषद, सहकार खाते व ईतर स्थानिक स्वराज्य संस्था 2001च्या शासन निर्णयाप्रमाणे आजही जाहिरात देत नाहीत. यासाठी मुंबई येथे सर्व संबंधित अधिकारी याना भेटुन निवेदन देण्यात यावे,शासनमान्य छोट्या व मध्यम वृत्तपत्रांच्या दर्शनी जाहिरातींच्या संख्येत वाढ करणेची मागणी शासनाकडे करावी ऐच्छिक पाच जाहिराती द्याव्यात महाराष्ट्र शासनाचे कोणत्याही विभागाने काढलेली जाहिरात क वर्ग दैनिके व साप्ताहिके याना मिळाली पाहिजे . या जाहिराती फक्त अ व ब वर्ग दैनिकानाच दिल्या जातात त्या सर्व क वर्ग दैनिके व साप्ताहिक याना द्याव्यात..इंटरनेटवर जाहिरात प्रकाशित केली तरी संपूर्ण जाहिरात वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी देण्यात यावी,
राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांची राज्य अधिस्विकृती समितीवर सदस्य म्हणून नियुक्ति करावी व राज्यातील प्रत्येक विभागीय अधिस्विकृती समितीवर संघटनेच्या एका सदस्याचा सामवेश करावा, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध आदी राज्य परिवहन महमंडळाच्या बस मध्ये अधिस्विकृती धारक पञकाराना प्रवास सवलत द्यावी, रेस्टहाऊस आरक्षण पंधराव्या क्रमांकावर आहे ते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात तर ते चौथ्या क्रमांकावरच असावे, जेष्ठ पञकाराना मानधन त्वरीत सुरु करावे , निकष पुर्ण करणारे वृत्तपत्रांची फेर तपासणी करुन त्याना शासनमान्य जाहिरात यादीवरील घेण्यात यावे आदी ठराव मंजूर करण्यात आले तसेच मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कै आचार्य बाळशास्ञी जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमीत्त दि 17 मे 2018 रोजी. पंढरपूर येथे संघटनेचे राज्य अधिवेशन घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
याबैठकीला राज्य अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय सचिव अजित म्हाञे, राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य चंद्रशेखर गायकवाड, राज्य संघटक प्रवीण पाटील, राज्य सचीव गोरख तावरे, महिला आघाडी प्रमुख सौ तेजस्वनी सुर्यवंशी, राज्य महासचिव प्रदीप कुलकर्णी, आनंद लोके, संतोष निखारे, भिका चौधरी,ओमप्रकाश शिंदे, प्रा. सुभाष लहाने ,रविंद्र वाघ, विक्रम पवार, किसन माने, भालचंद्र पाटील, दत्तात्रय सुर्वे, भगवान शहाणे, प्रल्हाद शिंदे,वसंत सोनार, विठ्ठल राऊत, सुदेश शेटे,भीमराव ऊल्हारे, सतीशश्चंद्र जकाते, यांच्या सह राज्यातुन सुमारे 50 ते 60 प्रतिनिधी ऊपस्थित होते.
शेवटी प्रा यशवंत गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा