काँग्रेसमुक्त नाही भाजप काँग्रेसग्रस्त

"पुढे कोणते सरकार येईल हे सांगता येत नाही," असे खळबळजनक वक्तव्य मंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. वास्तविक पाहता गिरीष बापट यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील सरकारबद्दल असलेला संताप व्यक्त केला आहे. असे म्हणावे लागेल. कारण काँग्रेस सरकारला वैतागलेल्या नागरिकांनी भाजपला भरभरून मते दिली आणि सत्ता दिली, मात्र भाजप सरकारने नागरिकांची निराशा केली आहे. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या हितापेक्षा धनदांडग्या व मोठ्या उद्योगपतींना पोषक असे निर्णय भाजप सरकारने घेतले आहेत. यामुळे बाजारपेठांमध्ये प्रचंड प्रमाणात मंदीची लाट निर्माण झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र सत्ता आल्यानंतर जी, सत्तेची मग्रुरी, सत्ताधाऱ्यांना येते, ती पाहायची असेल, तर भाजप नेत्यांचे चेहरे प्रसारमाध्यमांमधील चर्चेमध्ये पाहावेत. कारण प्रचंड मग्रुरी यांच्या चेहऱ्यावर दिसते आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे संपूर्ण बाजारपेठांची व छोट्या छोट्या उद्योगांची वाट लागली आहे. छोट्या उद्योजकांना उद्योग नाही, नोटा बंदीमुळे आवक - जावक बंद झाली आहे. याचा भाजप सरकार गंभीरपणे विचार करीत नाही. तर आगामी काळात याचे चांगला परिणाम नागरिकांना दिसून येतील, अशा आशा दाखवली जात आहे. मात्र आजचा दिवस जगता आला नाही, तर उद्या काय होईल, हे कसे पाहायचे, हे भाजप नेत्यांना कळत नाही,अशातला भाग नाही. मात्र "वेड पांघरून पेडगावला" जाण्याची भूमिका भाजप नेते घेत आहेत. आणि नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. "अबकी बार मोदी सरकार" "सब का साथ सब का विकास" असा नारा देत भाजपने केंद्रात व राज्यात सत्ता हस्तांतरित केली आहे. सत्ता आल्यानंतर प्रथम भाजप सरकारने काय केले असेल, तर पुढील पंचवीस वर्षांमध्ये देशात व राज्यात भाजपचे सरकार राहील, अशी घमेंडखोर भाषा वापरली आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यावेळेला भाजपबद्दल प्रचंड आदर, प्रेम, जिव्हाळा होता. हे नाकारता येणार नाही मात्र, सध्या भाजपबद्दल नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड चीड, राग, मत्सर, द्वेष निर्माण झाला आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही पंतप्रधानांबद्दल जेवढा अनुद्गार नागरिकांनी काढला नाही. तेवढे सोशल मीडियाद्वारे नागरिक मोदींबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. याची दखल घ्यावी, असे भाजप सरकारला वाटत नाही.ही राजकीय संवेदनशीलता नसण्याची भूमिका आहे. असे म्हणावे लागेल. म्हणूनच "पुढे कोणते सरकार येईल हे सांगता येत नाही" असे बहुदा मंत्री गिरीष बापट यांनी आपली भावना व्यक्त केली असावी. राज्यातील व केंद्रातील यापूर्वीचे सरकार हे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेत होते मात्र, भाजप सरकार सर्वसामान्य लोकांचा विचारच करीत नाहीत, हे गतकाळातील सरकारने घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे. सर्वसामान्य लोकांमधली चर्चामध्ये राजकारणाचा विषय आला की, प्रथमता भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्याबद्दल प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष आहे. सत्ता आल्यानंतर भाजपने आपला खरा रंग दाखवला आहे. कारण मित्रपक्षाला मित्रासारखे वागवले जात नाही. याचाच अर्थ भाजपाला प्रचंड प्रमाणात सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीखोर भाजप सरकारला उलथवून लावण्याची वाट सर्वसामान्य नागरिक पाहत आहेत. "नाराजी व संताप असला तरी, लोक भाजपलाच निवडून देतात" असा दाखला भाजप नेते देत आहेत. दरम्यान २०१९ ला होणाऱ्या निवडणुकांची वाट सर्वसामान्य नागरीक पाहत आहेत. याचवेळी भाजपला खरी सर्वसामान्य नागरिकांची ताकद कळेल. कारण काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात, भाजप काँग्रेसग्रस्त झाला आहे. याचे साधे भान भाजपच्या नेत्यांना राहिलेले नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.