गावच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे - आमदार बाळासाहेब पाटील अंतवडी ता.कराड येथे अंगणवाडी इमारत बांधणे आदी कामांचे भुमीपूजन व उद्घाटन


 कराड ( लक्ष्मीपुत्र ) -  गावच्या विकासासाठी आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे व ऐक्य वाढवा, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी अंतवडी ता.कराड येथे केले.

अंतवडी ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने कोयना भुकंप विकास निधीमधून अंतवडी ते पुसेसावळी-कराड रस्त्यास जोडणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करणे, जिल्हा नियोजन समिती निधीमधून अंगणवाडी इमारत बांधणे आदी कामांचे भुमीपूजन व उद्घाटन प्रसंगी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. या प्रसंगी गावातील नवनिर्वाचित उपसरपंच सौ सुभद्रा (अक्काताई) शिंदे, व नवनिर्वाचित ग‘ामपंचायत सदस्य तसेच माजी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर रिसवड-अंतवडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सदाशिव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, संजय थोरात, माणिकराव पाटील, भास्कर गोरे, डी.बी जाधव आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब बँकेचे संचालक सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, अंतवडी हे गाव राष्ट्रवादी कॉंग‘ेसच्या विचारावर प्रेम करणारे असून कार्यकर्त्यांची विकास कामांसाठी सातत्याने चिकाटी राहते. पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी सोलर सिस्टीम ची चांगली सोय करून पिण्याचे पाण्याचे काम पूर्ण झाले आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलामुलींची शैक्षणिक सोय चांगली झाली आहे. असे सांगून राज्यातील सद्याचे मंत्रीमंडळ हे विदर्भाचे आहे, त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन आकसाचा आहे, पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व मंजूर कांमे स्थगित ठेवली आहेत. शिक्षण सभापती यांच्या माध्यमातून शाळेचे वॉलकम्पाऊंड बांधणेस सहकार्य केले जाईल. या गावाला कुस्ती या मर्दानी खेळाची चांगली परंपरा असून, ती जोपसनेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

 स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदार संघातील हा विभाग बागायती होणेसाठी हणबरवाडी धनगरवाडी योजना पुर्ण करणेसाठी त्याचा पाठपुरावा सुरू आहे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकीने रहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले. 

जि.प सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी सांगितले की, आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदार संघातील सर्व गांवागावांत विकासाची कामे पूर्ण केली असून, यापुढे सर्व गावांना विकास प्रकि‘येत आणण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील प्रयत्नशील आहेत. आपआपसांतील मतभेद विसरून त्यांच्या पाठीशी ताकत उभी करण्याचे आवाहन मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी केले.
 कार्यक‘माचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक बापुराव शिंदे (सर) यांनी केले, तर आभार सुभाष निकम यांनी मानले.

 कराड पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब सुर्यवंशी, हिंदकेसरी पै.संतोष वेताळ, उत्तम माळी, मारूती कुंभार, संजय पिसाळ, मारूती जाधव, नाना पोळ, तलाठी राज्य संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, रमेश पोळ, संजय कुंभार, दिगंबर डांगे, संग‘ाम पवार, नेताजी चव्हाण,  आबा चव्हाण, माजी सरपंच आनंदराव शिंदे, अर्जुन शिंदे, जोतीराम शिंदे, मारूती चव्हाण, प्रकाश उर्ङ्ग दादासाो शिंदे, निवृत्ती शिंदे, शंकरराव शिंदे, दादासाो माने, जयवंत माने, विकास शिंदे पुणे, लक्ष्मण जाधव, सिद्धनाथ शिंदे, सुरज शिंदे, बापूराव शिंदे, त्रिंबक शिंदे, सौ.सगिता शिंदे, सौ.अर्चना माने, पै.संभाजी शिंदे, मनोज माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता टोपे, भोईटे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.