कराड मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची निवड
कराड दि.२(सावा) - केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेने केलेल्या उत्कृष्ठ कामगीरीची दखल राज्य शासनाने घेतली असून, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांचा लाभ इतर नगरपरिषदांना मिळावा यासाठी त्यांची महाराष्टातील पाच नगरपालिकांच्या मार्गदर्शकपदी नियुक्ती केली आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या की, स्वच्छ सर्वेक्षण 2018 स्पर्धेमध्ये कराड शहराने जी नेत्रदिपक कामगीरी करुन दाखवली आहे. या गौरवास्पद कामगीरीचे श्रेय नि:संशयपणे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना जाते. त्यांच्या मागदर्शनाखाली नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय नगरसवेक व सर्व कर्मचा-यांच्या सहकार्याने कराड शहराचा निश्चीतच अंतिम फेरीमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये समावेश होईल.
सातारा,वाई,मंगळवेढा,तळेगांव दाभाडे आणि लोणावळा या पाच महत्वाच्या नगरपालिकांचा यामध्ये समावेश आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये मुख्याधिकारी यांनी केलेल्या या कामामुळे कराड नगरपरिषदेचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांचा पुष्पगुच्छ देवून विशेष गौरव केला. यावेळी नगरसेवक विनायक पावसकर, फारुकभाई पटवेकर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा