सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी हर्षद कदम यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद

कराड  - शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख भानुप्रताप ऊर्फ हर्षद कदम यांनी आज वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करावा असा आशीर्वाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम यांना दिला.

मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी केला. सातारा जिल्ह्यात शिवसेनेची सुरु असलेली घौडदोड व शिवसेना करीत असलेला कामांचा कार्यअहवाल शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला. कराड येथील शिवसेनेची सभा यशस्वी करण्यासाठी व नियोजनबद्ध पद्धतीने आखणी केल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हर्षद कदम यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोचवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गतकाळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि शिवसेनेचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन सातारा जिल्ह्यामध्ये केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी दिलेला आशीर्वाद हा, माझ्यासह शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक व माजी आमदार दगडूदादा सकपाळ, कोल्हापूर- सिंधुदुर्ग शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, सातारा - जावली शिवसेना संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.