दीप पुरस्काराने रशिद शेख सन्मानित उत्तम संस्काराशिवाय खेळाडूला यशाकडे जाता येत नाही - सुरेश महाजनी
कराड दि.१६ (सावा) - खेळावर निष्ठा,मेहनतीची तयारी व उत्तम संस्काराशिवाय कोणत्याही खेळाडूला अपेक्षित यशाकडे जाता येत नाही.असे प्रतिपादन ज्येष्ठ क्रीडासंघटक सुरेश महाजनी यांनी केले.
कराड जिमखाना आयोजित स्व. दीपक शहा स्मृति सदभाव मेळाव्यात श्री महाजनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शाह,जन.सेक्रेटरी सुधीर एकांडे, उपाध्यक्ष अनिल शहा,दीपक वाटेगावकर व दीप पुरस्काराचे मानकरी क्रीडा संघटक रशिद शेख मंचावर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले आज सर्वच खेळात मोठ्या प्रमाणात खेळाडूंना पैसे मिळत आहेत. ही जशी चांगली गोष्ट आहे तसेच ही चिंतेचीसुद्धा बाब आहे. माञ उत्तम संस्कार व खेळावर निष्ठा ठेवुन मनोभावे मेहनत घेतली तर खेळातही उत्तम करिअर होऊ शकते. कराडसारख्या ठिकाणी रशिद शेख सारखी मंडळी तन, मन, धन अर्पून नवोदितांसाठी झटत असल्याचे बघुन अभिमान वाटला. गेली पस्तिस वर्ष रशिद खेळाचे कोणतेही तांञिक शिक्षण नसताना तसेच, आर्थिक परिस्थित नसताना जिद्दीने तरुण खेळाडू घडविण्याचे कार्य करतोय ते केवळ संघटन कौशल्य व प्रामाणिकपणावरच अशा संघटकांच्या पाठीशी समाजाने उभे रहाणे आवश्यक आहे.
यावेळी क्रीडा संघटक रशिद शेख यांना दीप पुरस्काराने श्री महाजनी व महेंद्रकुमार शाह यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मानपञ, मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते.
रशिद शेख म्हणाले, १९ वर्षाखालिल स्पर्धेच्या निवडीसाठी मी जाणार होतो त्यावेळी माझा खेळ बघता मी नक्किच निवडलो गेलो असतो माञ निवडीच्या आधी दोन दिवस सराव करताना मी पडलो व माझा पाय फ्रॅक्चर झाला व माझी दर्जेदार क्रिकेट खेळण्याची आशा मावळली.माञ मी ठरविले मला जमले तरी मी ऐकतरी खेळाडू राष्र्टिय पातळीवर नेणारच याच जिद्दीने मी डिलक्स क्रिकेट अकादमीची स्थापना करुन दैनंदिन सराव सुरु केला.आज शंभरएक मुले या अकादमीत दैनंदिन सराव करत आहेत व हे सगळे समाजातल्या अनेक दानशुर व्यक्तिंच्या सहकार्यानेच सुरु आहे या सर्वांचा मी रूणी आहे.
स्वागत व सुञ संचालन जनरल सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले. प्रास्ताविकात अध्यक्ष शाह यांनी पुरस्कारामागची भूमिका विषद केली. प्रमुख पाहुण्यांची ओळख दीपक वाटेगावकर यांनी करुन दिली. तर पुरस्काराचे मानकरी रशिद शेख यांची ओळख दीपक रमणलाल शहा यांनी करुन दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा