विद्यार्थ्यानी स्वत:चे व्यवसायाचे स्वप्न ठेऊन वाटचाल करावी - दिलीप गुरव


कराड   -  मराठी तरुण विद्यार्थ्यानी स्वताचा व्यवसाय करायचे स्वप्न ठेऊन पुढील वाटचाल करावी. सरकारी नोकरी मिळेलच याची आताच्या युगात शाश्वती देता येत नाही. गुलामगिरी पत्करण्यापेक्षा स्वतंत्र विचार करुन उद्योग धंदा उभारण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न करावा. 10 वी च्या विद्यार्थांनी या द्रुष्टीने प्रयत्न करावेत आणि  अशाच अभ्यास क्रमाची निवड करावी यासाठी तुम्हाला लागेल ति मदत कराड अर्बन बँक करेल.  सदैव आपल्या पाठीशी राहील व  मदत करेल असे मत कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी व्यक्त केले. 

सागवी ( पुणे) छ. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कै .सौ .शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा , शिशूविहर , नूतन माध्यमिक विद्यालय , मोडर्न नर्सरी , सुंदरबाई भानसिंग हुजा इंग्लिश मीडियम स्कूल सांगावीच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव बोलत होते. विठ्ठलराव ढवळे यांनी शाळेला 51 हजार रुपयाची देणगी दिली .यावेळी शाळेत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते 

भारतीय संविधानाच्या मूलतत्वाना खऱ्या अर्थाने न्याय देणारी शाळा आहे.  शाळेत वेगवेगळे प्रयोग, प्रकल्प केले जातात व मुलांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो, याचबरोबर मुलांच्या संस्काराकडेही लक्ष देऊन नवनिर्माण क्षमता, प्रतिभा, स्वप्नांचे वेड लावणे हे ज्या शाळेच्या हेडमास्तर , संचालक , शिक्षक यांना कळत तीच शाळा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते. म्हणूनच ही शाळा व भारतीय संविधानाच्या मूलतत्वाना खऱ्या अर्थाने न्याय देणारी शाळा आहे असे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव म्हणाले. सदर शाळेला 21 हजार रुपयाची देणगी देत आहे याचा उपयोग निश्चितच विद्यार्थाच्या व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शाळा उपयोग करेल असा विश्वासही दिलीप गुरव यांनी व्यक्त केला.

जयश्री गुरव  माहिती अधिकार समितीचे अध्यक्ष नितीन यादव, उद्योगपती बंडोपंत थोरवत , सोमनाथ कोरे, डॉ .दिलीप गरुड, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश साठे, संस्थेचे सचिव परशुराम मालुसरे , बाळासाहेब मोहिते, विलास थोरवत, दादासाहेब मगर , चव्हाण सर , सर्व शाळा व्यवस्थापण व शिक्षक पालक संघ सदस्य विध्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मुख्याध्यापक शिवाजी माने यांनी प्रास्ताविक केले. आभार भाऊसाहेब दातीर यांनी मानले. मुख्याद्यापक शिवाजी माने यांच्या मार्गदर्शनाखाली या  कार्यक्रमासाठी भाऊसाहेब दातीर सुनीता टेकवडे , हेमलता नवले , मनीषा लाड , सीमा पाटील ,  स्वप्नील कदम , सुनीता मगर , मानसी माळी , संदीप भुसारे , दीपली झणझणे , कानडे  मॅडम , श्रध्दा जाधव , संगीता सूर्यवंशी , नीता ढमाले , शोभा वरठि , पल्लवी तायडे , सुचीता पवार , पूजा ढमढरे , ममता सावंत , सीमा जगताप , प्रियंका लान्डे , शीतल नाईक , दिशा क्षीरसागर, राणी तरंगें ,  निर्मला भोइटे ,कुसुम ढमाले ,  चेतना इंगले , मनिषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.