मलकापूर नगरपंचायत स्वच्छ सव्हेर्क्षण मध्ये अव्वल ठरेल - शिवानी मंत्री

कराड ( लक्ष्मीपुत्र ) - नाविण्यर्पूण उपक्रम राबवून देशाच्या नकाशावर नाव झळकावणारी मलकापूर नगरपंचायत स्वच्छ सव्हेर्क्षण मध्ये अव्वल ठरेल. येथील नागरीकांची, महीलांची एकजूट कौतुकास्पद आहे. नवीन उपक्रमात, योजनेत सहभागी होवून तो पथदर्शी करतात. असे प्रतिपादन येथील शाखेच्या व्यवस्थापक सौ. शिवानी मंत्री यांनी केले.


नगरपंचायतीच्या स्वच्छ सव्हेर्क्षण २०१८ मध्ये सहभाग घेतला आहे. त्यासाठी अर्थिक मदत म्हणून येथील बॅंक आॅफ महाराष्ट्रा च्या येथील शाखेच्या वतीने नगरपंचायतीला पन्नास हजाराचा धनादेश देण्यात आला. त्यावेळी सौ. मंत्री बोलत होत्या. धनादेश मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.  नगराध्यक्षा साै. सुनिता पोळ, उपाध्यक्ष मनोहर शिंदे,कराड शाखेचे व्यवस्थापक नितीन पंडीत, श्वेता पाटील, उदय देशपांडे,  नगरअभियंता मल्लिकाजुर्न बनसोडे, स्वच्छता निरीक्षक रमेश बागल उपस्थिती होती. 

साै. मंत्री म्हणाल्या, महाराष्ट्र बॅंकेने नेहमीच सामाजिक बांधिलिकी जपली आहे. समाजातील सकारत्मक कामासाठी बॅंक आॅफ महाराष्ट्रा सदैव पाठीशी असते. येथील नगरपंचायतीचे प्रयत्न, तळमळ पाहता नगरपंचायत स्वच्छ सव्हेर्७णात यशस्वी होईल.

उपाध्यक्ष श्री. मनोहर शिंदे म्हणाले, नागरीकांच्या सहकायार्ने देशातील ४०५१ शहरांमधून मलकापूर अप डाऊनलोड करून त्यादवारे तक्रार निवारण करण्यात १७ व्या स्थानावर आले आहे. हि अभिमानाची बाब आहे. स्वच्छतेमध्ये मलकापूर मानाचा तुरा रोवल.  स्वच्छ, सुंदर व हरीत मलकापूरसाठी महाराष्ट्र बॅकेने एसी.एस. एार फंड अंतर्गत स्वच्छ स्वर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला.

शिल्पा शेटे यांनी प्रस्ताविक केले. शाहीन मणेर यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.