डिाजिटल साक्षर होणे ही काळाची गरज - सारंग पाटील
कराड - सातारा जिल्हयाला थोर व्यक्तिमत्वांची परंपरा आहे. त्यांचा आदर्श घेवून युवा पिढीने आपले भविष्य घडवावे. शिकण्याच्या वयात योग्य सुविधा मिळत असतात आणि योग्य मार्गदर्शन मिळत असते. दानूशर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम यांचे कार्य समाजासाठी उपयोगी असून त्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्य प्रमुख् सारंग पाटील यांनी केले.
कराड येथील सदगुरु गाडगे महाराज कॉलेज येथे दानूशर बंडो गोपाळा कदम यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या डिाजिटल साक्षरता कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने व प्रा.डॉ.अभय पाटील यांची प्रमुख् उपस्थिती होती.
सारंग पाटील म्हणाले, जिल्हयाला थोर महापुरुंषांची परंपरा आहे. बहुजनांची, सर्व समान्यांची मुले शिकावी म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. त्यांच्या पुण्याईमुळे पुढच्या अनेक पिढया शिकल्या, समृध्द झाल्या. केवळ शिक्षणाच्या जोरावर सामाजिक प्रगती होत असते. शिक्षणाची ताकद काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिक्षणात मोठे बदल होत असून तंत्रज्ञान आल्यामुळे डिाजिटल साक्षर होणे ही काळाची गरज बनली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग एकमेकांजवळ आले आहे. बदलता शैक्षणि प्रवाह लक्षात घेता विदयार्थ्यांनी स्वतः मध्ये बदल घडवून घ्यावा. ग्रामीण भागातून आलेल्या विदयार्थ्यांना रयत ने सदगुरु महाविदयालया मध्ये दिलेल्या शैक्षणिक सुविधा दर्जेदार आहेत. त्याचा योग्य लाभ घेवून समाजापुढे स्वत्ः एक आदर्श निर्माण करा.
माहिती तंत्रज्ञानातील गतीमान नेतृत्व म्हणनू सारंग पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हाती घेतलेले डिजिटल साक्षरता अभियान हे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे. त्यामुळे डिाजिटल नागरिक बनण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन डॉ. मोहन राजमाने यांनी केले. यावेळी डॉ. अभय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा