आयुष्य सुन्दर
स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं!
विश्वास उडाला की आशा संपते!
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते!
म्हणुन, स्वप्न पाहा, विश्वास ठेवा
आणि काळजी घ्या!
आयुष्य खूप सुन्दर आहे...
प्रत्येकाचे आयुष्य फार सुंदर, सुखकारक, मनोरंजक आहे. ते विश्वासाने जगले पाहिजे. दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येकाने कोणते ना, कोणते स्वप्न पाहणे गरजेचेच आहे. स्वप्न परिपूर्तीसाठी सकारात्मक प्रयत्न केला पाहिजे. स्वप्न संपलं की आयुष्य थांबतं, असं म्हटले जाते. आपल्या स्वप्नरंजनात जगणं हा एक वेगळाच आनंद आहे. आयुष्यात असेच पुढे आनंदाने जायचे असेल तर स्वप्नही पहावीच लागतील. जगण्यावर विश्वास पाहिजे, विश्वास असेल तर जगणे आनंदकारक होईल. आणि जगण्यावरचा विश्वास संपला की आशा संपते. स्वप्न, विश्वास, अाशा यामुळेच जीवन परिपूर्ण होऊ शकते. स्वतःची काळजी स्वतःच घेतली गेली पाहिजे. स्वतःवर मनसोक्त प्रेम करायला शिकले पाहिजे. स्वतःवर प्रेम करताना दुसऱयाचा दुस्वास करणे सोडले पाहिजे. म्हणूनच मनसोक्त स्वप्न पाहा, कोणती तरी आशा ठेवा, आणि विश्वासाने जगा, जीवनात परिपूर्ण प्रेम
मिळेल. म्हणूनच म्हटले जाते, आयुष्य सुंदर आहे ते सकारात्मक पद्धतीने जगले पाहिजे. आनंदी जगण्याचे अनेक मूलमंत्र आहेत. तसेच जीवनातील अाशा परिपूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत. विश्वासाने जगत असाल आणि विश्वासाने स्वताकडे पहात असाल तर जीवनात प्रेम भरभरून मिळेल. शतदा प्रेम करावे, जीवन गाणे गात चलावे. शतदा प्रेम करावे. म्हणजे प्रत्येकांवर प्रेम करायलाच हवे. जीवन एक गाणे आहे. आपला सूर बेसूर असेल तरी गाणे गुणगुणायला काही हरकत नसावी. जिवन जगताना स्वप्नाच्या भावविश्वात रम्य होऊन, आशादायक जीवन फलद्रुप होईल, या पद्धतीने विश्वासाने जीवनाचा मार्ग सुरू केला तर, सर्वांचे प्रेम निश्चित मिळेल, यात शंकाच नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा