संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवली - सदाभाऊ खोत


कराड - महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. या महाराष्ट्रामध्ये संत गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवली. गाडगे महाराजांनी महाराष्ट्रातील माती आणि माणसाची मने स्वच्छ केले असे प्रतिपादन कृषी, फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील प्रा डी के यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ मोहन राजमाने होते. मधुकर सावंत, अतुल कदम, गौरी कचरे, मानसिंग जाधव, अरुण पाटील उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सद्गुरू गाडगे महाराज यांच्या नावाने महाविद्यालय सुरू केले. गाडगे महाराजांनी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेची महूर्तमेढ रोवली. थोर माणसं समाजाला विचार देऊन जातात. संत गाडगे महाराज कर्मवीर भाऊराव पाटील आज जरी नसले तरी पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाने रयत शिक्षण संस्थेतील किंवा इतर विद्यार्थ्यां वाटचाल करून वेगवेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करीत आहेत. थोर व्यक्तींच्या कार्यामुळे समाजाची खऱ्या अर्थाने जडणघडण झाली आहे. पाय जमिनीवर ठेवून समाजासाठी काम करावे. असे आवाहनही मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

प्राचार्य डॉ मोहन राजमाने म्हणाले, रयतसेवक हा विद्यार्थ्यांची जडणघडण करण्याचे काम करतात. तसेच आपला विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा, त्याने स्वयंरोजगार निर्माण करावा, यासाठी सतत मार्गदर्शन करीत असतात.

यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, आनंद कचरे, सुभाष ढगे, व्ही. के. पाटील, प्रा. डी. के. खोत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य एच. के. काळे यांनी केले. प्रा संगीता जाधव, प्रा वंदना किशोर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीपकुमार कसबे यांनी आभार मानले.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.