सर्वांगिण विकास कामे पूर्ण करण्यास कटीबध्द - आमदार बाळासाहेब पाटील

 कराड (लक्ष्मीपुत्र)सध्याच्या राज्य व केंद्र सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय होत असून, लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा सर्वांगिण विकासकामे पूर्ण करण्यास कटीबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी मांडवे येथे केले. 


 ते मांडवे ता.सातारा येथे आमदार निधीतून सामाजिक सभागृह बांधणे या कामाचे भूमिपूजन तसेच डोंगरी विकास निधीतून अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण करणे या कामाचे उद्घाटन तसेच १४ व्या वित्त आयोगातून अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे या कामाचे भुमीपूजन तसेच डिजीटल अंगणवाडी शाळा खोल्यांचे उद्घाटन आदी प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

 यावेळी कराड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य देवराज पाटील, कराड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जि.प सदस्य मानसिंगराव जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर ठोकळे, सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत, ऍड.लालासाहेब पवार मांडवेकर, अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याचे संचालक माधवराव जाधव, नागठाणे येथील यशवंत (नाना) साळूंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, यापूर्वी आदरणीय भाऊसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा विकास झाला आहे. त्यानंतरच्या काळात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विकास कामांना चालना दिली.  विकास हि कायम चालणारी प्रकि‘या आहे, २००९ सालापासून आपण दिलेल्या संधिमुळे मला याविभागामध्ये अनेक विकासकामे करता आली. परंतू सध्याचे सरकार शेतक-र्‍यांच्या बाबतीत उदासिन आहे. खोटे बोलून रेटून संागणे हा एककलमी कार्यक‘म सरकारने सुरू केला आहे, यापुढील काळात आपआपसांतील मतभेद विसरून ऐक्य वाढवा आणि शेती आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग‘ेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत म्हणाले की आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा तालुक्यामधील कराड-उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये समाविष्ट गावांच्या विकासाला गती आली असून यापुढील काळात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. ऍड. लालासाहेब पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून विभागामध्ये झालेल्या कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांची माहिती दिली. व उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली.

संजय पवार यांनी प्रास्तावीक केले व ऍड. विकास पवार यांनी आभार मानले. माजी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण साळुंखे, मनोहर साळुंखे, आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब बँकेचे संचालक सागरदादा पाटील, हेमंत ठक्कर, संजय पिसाळ, मधुकर यादव, ङ्गत्तेसिंग पाटील, नारायण साळुंखे, माधवराव जाधव, जयसिंग चव्हाण, सह्याद्रि कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, पै.संजय थोरात, भास्करराव गोरे, संजय शिंगाडे, दत्ता ढाणे, सचिन पाटील, विशाल जाधव, अमित शिकलगार, सरपंच राजेंद्र माने, उपसरपंच रमेश ङ्गणसे, ऍड दिलीपराव पवार, संजय पवार, सोसायटीचे चेअरमन विष्णू पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता साळुंखे, शाखा अभियंता आर.वाय.साळुंखे, ग‘ामीण पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता गोरे, उपअभियंता देशमुख, उत्तमराव पवार, ऍड संजय पवार, पोपट गुरव, इकबाल मुलाणी, शंकर ङ्गणसे, बालेखान मुलाणी, रविंद्र शिंदे, भिकाजी केंजळे, अमोल काशिद, चंद्रकांत वायदंडे, यशवंत लोहार, रविंद्र शिंदे, बजरंग पवार, बाळकृष्ण माने, ज्ञानदेव अवघडे, हणमंत सुतार, सौ.जास्मीन मुलाणी, सौ.कमल माने, सौ.उमा पवार, सौ.रोहिणी माने, सौ.शुभांगी माने, सौ.अर्चना माने, गवळणवाडीचे संजय झोरे, भैरवगडचे सरपंच रामचंद्र साळुंखे, उपसरपंच सौ.लता मोरे, शांताराम साळुंखे यांचेसह मांडवे, नागठाणे, भैरवगड, पिरेवाडी, गवळणवाडी, मानेवाडी येथील ग‘ामस्थ मोठ्या सं‘येने उपस्थित होते.
 ङ्गोटो ओळ - मांडवे येथील विविध विकास कामांच्या भूमीपुजन व उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा.आमदार बाळासाहेब पाटील समवेत मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, लालासाहेब पवार, संजय पवार आदी.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.