उदयनराजे भोसलें विरोधात डॉ. अतुल भोसले लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांच्या विरोधात भाजपचा खमक्या उमेदवार असणार !
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - आगामी लोकसभा निवडणुकीत सातार्यात भोसले विरुद्ध भोसले असा राजकीय संघर्ष दिसू शकतो. आणि याचीच जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सलग दोनदा छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देऊन सातारचा गट हा राष्ट्रवादीचा आहे. असे सिद्ध केले आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीने सातारचा गड जिंकायचाच असा चंग बांधला आहे. यासाठी युवानेते डॉ. अतुल भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
सातार्याचे बडे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोण शह देऊ शकेल ? या प्रश्नावर भाजपमध्ये खलबत सुरू आहे. यावर सध्या तरी भाजपकडे एक जोरदार पर्याय आहे. आणि तो म्हणजे, कराडचे युवानेते आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले होय.सातारा लोकसभा मतदार संघामध्ये सक्षम उमेदवार म्हणून डॉ.अतुल भोसले निवडणूक लढवू शकतात.यापूर्वी डॉ.अतुल भोसले यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढून मताधिक्य घेतले आहे.पाटण, माण, खटाव, वाई, महाबळेश्वर, फलटण तालुक्यांमध्ये विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचा फारसा संपर्क राहिलेला नाही असे बोलले जात आहे.
छत्रपती खा.उदयनराजे भोसले यांचा ५१ वा वाढदिवस जोरदारपणे साजरा करण्याची तयारी सुरु झाली आहे.येत्या २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे.या दिवसाची जय्यत तयारी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहत्यांकडून सुरू आहे. हा वाढदिवस दणक्यात राजेशाही पद्धतीने साजरा करत यानिमित्ताने राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा लोकसभेसाठी आपला दावा मजबूत करण्याची संधी साधण्याची तयारी सुरु असल्याचे ओलले जात आहे.
बुधवारी झालेल्या कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र येऊन मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना मान्य होईल, अशाच उमेदवाराला तिकीट मिळण्याची चिन्हे आहेत.दरम्यान सध्या तरी भारतीय जनता पार्टीपुढे डॉ. अतुल भोसले हेच सक्षम पर्याय दिसून येत आहेत.
राज्यभरामध्ये शिवसेनेने ‘अकेला चलो रे‘ चा नारा दिला आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना असणार नाही.भाजप आणि शिवसेनेची ’युती’ भविष्यात होणार नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. अशावेळी, भाजपला आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे.
कराडचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. अतुल भोसले हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे भाऊ आणि आमदार दिलीपराव देशमुख यांचे जावई आहेत.गौरवी देशमुख हिच्याशी डॉ. अतुल भोसले यांचा विवाह झाला आहे.लातूरच्या देशमुखांचे जावई असलेल्या डॉ. अतुल भोसले यांच्या कुटुंबाचा पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच दरारा आहे.सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी सातारा जिल्ह्यामध्ये केलेले काम उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, माण, खटाव, वाई महाबळेश्वर या तालुक्यातील रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमार्फत सवलत देवून अनेक सुविधा दिल्या आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आग्रहाखातर डॉ. अतुल भोसले यांनी गतकाळात कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीपार्टीच्या-वतीने विधानसभेची निवडणूक लढविली होती.डॉ. अतुल भोसले सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. त्यांच्याकडे राज्यस्तरीय सरचिटणीसपद आहे. डॉ.अतुल भोसले यांचा सातारा लोकसभा मतदारसंघात चांगला संपर्क आहे.आगामी लोकसभा निवडणुकी-मध्ये विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विरोधात युवानेते डॉ.अतुल भोसले अशी लढत होईल. असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज असून बरेच वर्ष झाले खासदारपद कराडला नाही, ते पुन्हा डॉ.अतुल भोसले यांच्या स्वरूपात कराडकडे येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा