आक्रमक, बिनधास्त, रयतेचा राजा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सध्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर महाराष्ट्रातील मराठी माणूस निस्सीम प्रेम करतो. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर मराठी माणूस प्रेम करतो, आणि जिव्हाळा आस्था मराठी माणूस बाळगतो. महाराष्ट्रातील बहुतांश युवावर्ग श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत. आपल्या बिनधास्त व समाजकार्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले देशभर प्रसिद्ध आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने घेतलेला आढावा. सातारा लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दैनिक लक्ष्मीपुत्र परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा. . . . . संपादक सुलतान फकिर

मी काल पण तुमचा होतो, आज ही तुमचाच आहे,आणि भविष्यात बदल होणार नाही. असा विश्वास छत्रपती उदयनराजे भोसले रयतेला देत असतात. यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर निस्सीम व जिवापाड प्रेम करीत आहे. सामान्य रयतेच्या मनातील खदखद व विचार उदयनराजे भोसले आपल्या कृतीतून प्रकट करीत असतात. रयतेला न्याय मिळाला पाहिजे, सामान्य लोकांचे प्रश्न चुटकीसरशी सुटले पाहिजेत, अशी त्यांची भावना असते. प्रशासकीय अधिकारी यांनी रयतेची
कामे केली नाहीत, तर मात्र छत्रपती उदयनराजे भोसले आक्रमक होतात. यामुळे उदयनराजे भोसले यांच्या सूचनेप्रमाणे सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्यांची कामे अग्रक्रमाने करीत आहेत.

काही लोक निवडून मोठ्या पदावर जातात. आणि त्यांना वाटत आपल्यामुळे समाज आहे. पण तस नाही, या संपूर्ण समाजामुळे तुम्ही - आम्ही आहोत, ही शिकवण शिवछत्रपतींची आहे.ती विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली आहे. त्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा प्रयत्न छत्रपती उदयनराजे भोसले करीत असतात. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे समाज नसतो, तर समाजामुळे लोकप्रतिनिधी असतो. याचे भान ठेवावे अशी, अपेक्षा छत्रपती उदयनराजे भोसले महाराज सर्व लोकप्रतिनिधीकडून ठेवत असतात. कारण ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेली आहे. सर्व घटकांचा मिळून समाज निर्माण झालेला आहे. आणि या समाजामुळेच तुम्ही आम्ही आहोत, ही भावना खासदार उदयनराजे भोसले सातत्याने मनोमनी बाळगत असतात.

माँसाहेब जिजाऊँ व शिवछत्रपती यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन या स्वराज्याची स्थापना केली. आजच्या नवीन पीढ़ीने त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. माँसाहेब जिजाऊनी शिवछत्रपतींना आदर्शाचे धडे घालून दिले आहेत. सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले. यामुळे आजच्या तरुण पिढीने शिवछत्रपतींच्या आदर्शाने वाटचाल करावी अशी आशा खासदार उदयनराजे भोसले युवावर्गाकडून बाळगत असतात. यापद्धती युवावर्गाचे प्रबोधन करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघातून गेल्या दहा वर्षांपासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. सातारा लोकसभा मतदार संघातील जनतेने त्यांना लाखोंच्यावर प्रचंड मताधिक्यांनी दोनवेळा निवडून दिलेले आहे.

लोकशाहीमधे सर्व समाजाला योग्य न्याय व संधी मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही आग्रही आहोत विशेषता शिक्षण आणि नोकरी. अशी प्रतिक्रियाही खासदार उदयनराजे भोसले सातत्याने व्यक्त करीत असतात. समाजातील तळागाळातील वर्गांना शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, शिक्षण झाल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, असाच आग्रह नेहमी खासदार उदयनराजे भोसले धरत असतात. सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, ही लोकप्रतिनिधींची भूमिका खासदार उदयनराजे भोसले इमाने - इतबारे राबवीत आहेत. दरम्यान सुशिक्षित बेरोजगारांना कामधंदा मिळाला नाही, तर मात्र, ते आक्रमक भूमिका घेतात. आणि म्हणतात, तुम्हाला काही अड़चन असेल तर माझ्याकडे या, मग मी काय करायच ते बगतो, वेळप्रसंगी तुमच्यासाठी रक्त सांडायची माझी तयारी आहे. असा दिलासाच देतात, आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले घेतात. यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा शब्द मराठी युवक खाली पडू देत नाहीत, ते म्हणतील ते करण्याची तयारी ठेवतात.

लग्नाचा वाढदिवस... साजरा करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अशी,
राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते, ती राणीसाहेबांनी मला नेहमीच दिली. त्यांच्या भक्कम साथीमुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या प्रश्न जाणून त्या सोडवण्यासाठी बळ मिळते. राणीसाहेबांच्या साथसोबतीमुळे समाज व राजकारणात आपण काम करू शकतो, अशी कबुलीही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जाहीरपणे देतात.

आश्रम शाळेला सदिच्छा भेट देण्याच्यावेळी विद्यार्थ्यांना कपडे, खाऊचे वाटप करून मुलांशी दिलखुलास संवाद साधणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले भावुक होतात.आम्हाला आई वडील मिळाले, तुम्हाला मिळाले नाहीत. पण एकच सांगतो, तुमचे आई आणि वडील उदयनराजे आहेत. आय लव्ह यू ! मनापासून सांगतो, तुम्ही सर्व माझी मुले आहात. आय लव्ह यू ! असे म्हणतच खासदार उदयनराजे भोसले बालनिरिक्षण गृहातील मुलांपुढे गहिवरले. तेव्हा सर्वच उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. अनाथांचा नाथ म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. ज्यांना आई, वडील नाहीत, अशा अनाथ बालकांचा मीच पालक आहे. हेही सांगायला ते विसरत नाहीत. अनाथ बालकांना पाहून भावनाविवश होतात, डोळ्यात अश्रू येतात, आणि गहिवतात तेच, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले.

सातारा लोकसभा मतदार संघांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना संपूर्ण मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, यासाठी विविध प्रकारचा निधी उपलब्ध करून देतात. विकास निधी वाटप करताना खासदार उदयनराजे भोसले भेदभाव करीत नाहीत. सातारा जिल्हयातील बांधकाम सुरू असलेल्या तारळी, धोम-बलकवडी, कुडाळी, वांग व मोरणा (गुरेघर) या सिंचन प्रकल्पांना, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून एकूण 445 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेकरीता केंद्र शासनाच्या स्पेशल पॅकेजमधून अर्थसहाय्य देण्यास सहमती मिळवण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची किमया खासदार उदयनराजे भोसलेच करू शकतात.

सातारा जिल्ह्यातील तारळी, धोम-बलकवडी, कुडाळी, वांग व मोरणा (गुरेघर) या सिंचन प्रकल्पांना केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून आवश्यक तेवढा निधीउपलब्ध करून देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न केल्याने तारळीसाठी 105 कोटी, धोम बलकवडीकरिता 100 कोटी, वांग प्रकल्पाकरीता 50 कोटी, मोरणा गुरेघर 30 कोटी, कुडाळी प्रकल्पासाठी 40 कोटी, उरमोडी प्रकल्पासाठी 100 कोटी असा एकूण 425 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. याशिवाय जिहे कठापूरसाठी 20 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

उरमोडी प्रकल्पामुळे सातारा तालुक्यातील सुमारे 1000 हेक्टर क्षेत्रओलिताखाली येणार असून सातारा डावा कालवा 10 कि.मी.पर्यंत पूर्ण करून त्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. डाव्या कालव्यावरील भोंदवडे उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याच्या टप्यावर असून 14 कि.मी.पाईपलाईनव्दारे सातारा तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सातारा उजवा कालव्यावरील भोंदवडे जलसेतूचे बंद असलेले काम पूर्ण झाले आहे. माण कालव्याचे कि.मी. 20 पर्यंतचे काम पूर्ण करून ऑगस्ट 2017 मध्ये यातून पाणी सोडण्यात आले आहे. 31 कि.मी.लांबीचा हा कालवा जून 2018 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. धोम-बलकवडीतून पुणे जिल्हयातील भोर, सातारा जिल्हयातील खंडाळा व फलटण या दुष्काळी भागास पाण्याचा लाभ होत आहे. या प्रकल्पातील एकूण 147 कि. मी. लांबीच्या उजवा कालव्याचे कि. मी. 93 ते 130 या लांबीतील कामे पूर्ण करून दुष्काळी भागात पाणी पोहचविणेत आले. कि. मी. 140 येथील बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. हा कालवा मार्च 2018 पर्यंत पूर्ण होवून फलटण तालुक्यात दुष्काळी भागातील 51 गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. प्रकल्प 2019 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कुडाळी प्रकल्पातील कालव्याचे काम बंदिस्त नलिकेद्वारे करण्याचे नियोजन असून या प्रकल्पांसाठी 40 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवून महू धरणाचे काम सुरू केले असून जावली तालुक्यातील 13000 एकर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व पुनर्वसनाची कामे अनेक वर्ष प्रलंबित होती. ती मार्गी लावण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. राजकारण, समाजकारण, नगरपालिका यासह विविध क्षेत्रांमध्ये खासदार उदयनराजे भोसले नेहमी कार्यरत व कार्यमग्न असतात. राजकीय टीका - टिप्पणी करताना खासदार उदयनराजे भोसले कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. सामान्य जनता हीच आपली ताकद आहे. या भरोशावर विविध क्षेत्रात खासदार उदयनराजे भोसले बिनधास्तपणे वावरत असतात. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.