सातारा जिल्ह्यात शिवसेनेला प्रभावी करणारे - हर्षद कदम

सातारा जिल्ह्यातिल पाटण तालुक्यातील मल्हारपेठ गावचे उदयोन्मुख तरूणांचे आयडॅाल तडफदार नेतृत्व शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख मा.भानुप्रताप उर्फ हर्षद मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा---------   
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या विचारावर निस्सिम प्रेम करणारे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी सातारा जिल्ह्यात शिवसेनेची चांगल्या प्रकारे बांधणी केली आहे. नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कराडात सभा झाली, सभा यशस्वी व नियोजनबद्ध पद्धतीने हर्षद कदम यांनी पार पाडली आहे. बऱ्याच वर्षानंतर कराडमधील भाजीमंडई परिसरात, जनता व्यासपीठाशेजारी शिवसेनेची न भूतो न भविष्यती अशी सभा पार पडली. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून हर्षद कदम यांच्या गळ्यांमध्ये घातलेली माळ यशस्वी झाले असे म्हणता येईल.

ठाणे जिल्ह्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे शिवसेनेचे  नेते धर्मविर कै.आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यात वाढलेले कदम कुटुंबिय गेली ४० वर्षे व्यवसायानिमित्त ठाणे येथे राहत होते .कै.दिघे साहेबांचा व कदम कुटुंबाचा अगदी जवळचा संबध असल्याने कै.दिघे साहेबांच्या कामाची पद्धत व त्यांचा जनसंपर्क कदम कुटुंबाने अगदी जवळून पाहिला आहे. याचाच परिपाक म्हणून वडिल मोहनराव कदम (तात्या)यांनी पाटण तालुक्यातील ग्रामीण भागातून ठाणे शहरात वास्तव्य करुन शहरातील लोकांशी सामाजिक नाते निर्माण केले होते.त्यामुळेच  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ही तात्याचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध  निर्माण झाले होते. तेव्हापासून शिवसेनेशी त्यांचे नाते एवढे घट्ट झाले आहे  कि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या कुटुंबाला निष्ठचे फळ म्हणून हर्षद कदम यांना एेन तारुण्याच्या उंबरठ्यावर मायभुमिचा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ही संधी शिवसेना कार्यध्यक्ष उध्दवजी ठाकरे, परिवाहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री विजय बापु शिवतारे संपर्कप्रमुख उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्या सहकार्याने  मिळाली आहे. हर्षद कदम यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी शिवसेनेचे काम सुरू आहे .

    सातारा जिल्ह्यात शिवसेनेला तरुण नेतृत्व मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातील तरुणांना एक स्फुर्तीदायक उत्साह लाभला आहे. जिल्हातील युवावर्ग हर्षद कदम यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्यामुळे शिवसेनेला निश्चितच याचा फायदा होत आहे.हर्षद कदम शिवसेनेची ध्येय धोरणे व शिस्त पाळणे आणि दिलेले वचन निभावने, गोरगरीब जनतेची सेवा करणे यापध्दतीने काम करीत आहेत.शिवसेनेसारख्या प्रखर विचारांच्या राजकीय पक्षाचे काम तन्मयेतुन करीत आहेत. हर्षद कदम यांना सामाजीक कामाचे बाळकडू घरातूच मिळाले आहे वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवुन शिवसेना संघटनेच्या बांधणीसाठी काम करत आहेत. कदम कुटुंबियांची पक्षनिष्ठा पाहूनच सातारा जिल्ह्यात काम करण्यांचा बहुमानच मिळाला आहे.

    हर्षद कदम हे मनमिळावू स्वभावाचे असलेने वडिलांनीच त्याच्यातील नेतृत्व गुण ओळखले होते. प्राथमिक शिक्षण सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल ठाणे  तर एन. जी.कॉलेज ऍाफ कॉमर्स व पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असल्याने शिवसेना पक्षनेतृत्वाने हर्षद कदम या उमद्या नव्या नेतृत्वाला सातारा जिल्हयात पक्ष बांधणीची महत्वाची जबाबदारी दिली आहे.यामुळे पाटण तालुक्याला एक बहुमान मिळाला आहे.शिवसेना पक्ष वाढीसाठी ते महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाभिमुख काम करत आहेत. सुस्वभावी व सोज्वळ असे हे व्यक्तीमत्व आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेने  प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वारंवार आंदोलने, मोर्चे काढले आहेत.अवघ्या दीड वर्षाच्या कारकिर्दित्ा हर्षद कदम यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे नाकरुन चालणार नाही.

    हर्षद कदम हे गोरगरीब होतकरू तरुणांच्या हाताला काम, माध्यमिक, प्राथमिक शाळाच्या गरजेनुसार शालेय साहित्य वाटप, रुग्णांना उपचारासाठी मदत, सांस्कृतिक कला क्रीडा यामध्ये सुरू असलेला  सहभाग कौतुकास्पद आहे.स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत व सेवा सोसायट्या्च्या माध्यमातून हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली चांगले यश संपादन होत आहे. हर्षद कदम या तरुण तडफदार उमद्या शिवसेना जिल्हाप्रमुखास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.