सकारात्मक मैत्री . . . . सुंदर जीवनाची माळ

सकारात्मक मैत्री
सुंदर जीवनाची माळ

काटा जरी काट्यासारख वागला तरी, फुलानं आपल फुलन सोडायचे नसतं, जीवन कितीही खडतर असले तरीही, माणसानं आपली माणसं सोडायची नसता... ही खरी मैत्री होय. सर्वसाधारणपणे जीवन जगत असताना, काट्याला नकारात्मक उपमा देऊन पुलाला सकारात्मक उपमा दिली गेली आहे. काटा बोचतो, वेदना देतो, दुःख देतो म्हणून काट्याला नकारात्मकता म्हटले. तर फूल सुगंध देतो, उल्हास देतो, मनाला आनंद देतो, नजरेला सुखावतो, म्हणून फुलाला सकारात्मकता म्हटले असेल. प्रत्येकाचे जीवन सुखकारक असतेच असे नाही, तर जीवन मार्ग खडतर असला तरी, तो मार्गक्रम करावाच लागतो. खडतर जीवनाचा प्रवास सुरू असताना, आपली माणसं जपून ठेवावी लागतात, तीच माणसं जीवनामध्ये उपयोगी येत असतात. खडतर जीवन सुरू असताना, अनेक विचारांचे माहोल मनात सुरू असते. मन विषन्न अवस्थेत गेलेले असते. जगणे मुश्किल झाले म्हणजे, जीवन संपवावेसे वाटते, जीवनाला काही अर्थ नाही, अशी मनोभावना निर्माण होत असते. म्हणूनच जीवनाला मुलांच्या सुगंधा सारखे जपावे, आपल्या कोमल मनाला वेदना झाल्या तरी त्या सुखकारक आहेत. असा सकारात्मक विचार केला की, जीवन अधिक सुसह्य व आनंदमय होईल, हे मात्र निश्चित. म्हणूनच सकारात्मक विचार जीवनात महत्त्वाचे आहेत. दुःख उगळीत बसण्यापेक्षा सुख, आनंदकारक कसे मिळेल. याचा शोध घेणे, आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, हे महत्त्वाचे आहे. सुख, दुःखात आपण बरोबर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आपला सखासोबती आणि मित्र असतो. अशा मित्रांची मैत्री जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत जपण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे जीवनाची काटेरी वाट, फुलांनी सुगंधी निश्चित होईल. जीवनातील खडतर म्हणजे काट्यांचा विचार करण्यापेक्षा, जीवनातील सुगंधी फुलांचा दरवळ सुरू राहील, अशा पद्धतीने मानसिकता ठेवल्यानंतर आणि सकारात्मक विचार केल्यानंतर, जीवनाचा मार्ग खडतर वाटणार नाही. जीवन आनंदी वाटेल, सुखकारक वाटेल, यासाठी सकारात्मक म्हणजे सकारात्मकच विचार करणे अत्यावश्यक आहे. 


सुंदर जीवनाची माळ


नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सुधारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे रहाल. जन्मानंतर एका व्यक्तीचे, अनेक नातेसंबंध निर्माण होत असतात. प्रत्येक नात्याला एक स्नेहाची गुंफण असते. प्रारंभापासून शेवटपर्यंत प्रत्येक नातेसंबंध, प्रेमकारक राहीलच असे नाही. कारण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाकडून काही ना काही चुका घडत असतात. चुका शोधण्याचा प्रयत्न, प्रत्येक नातेसंबंधाने केल्यास, अशी नाती बिघडतील, हे मात्र निश्चित. म्हणूनच नात्याची सुंदरता, एकमेकाचा सुका चुका सुधारण्यात आहे. असे म्हटले जाते, हा जीवनातील सकारात्मक विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही दोष असतोच. दोषांची बेरीज करायची का ? वजाबाकी करायची? हे प्रत्येकाच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. समोरच्या व्यक्तीचा दोष दाखवणे, याचेही अनेक प्रकार आहेत. किंवा समोरच्या व्यक्तीच्या दोषांवर सातत्याने बोट ठेवणे, हेही योग्य नाही. दोषविरहित व्यक्तीचा स्वभाव असूच शकत नाही, हे सत्य स्वीकारावेच लागेल. म्हणूनच जीवनामध्ये दोषांची कधीही बेरीज करू नये. तर दोषांची जीवनातून वजाबाकी करावी म्हणजे, जीवनाला सुंदरता प्राप्त होईल. सुंदरता, एकरूपता, आनंदकारक, सुखकारक, उत्साह, उत्स्फूर्तपणे जीवन जगायचे असेल तर, दोषांना बाजूला केले पाहिजे. अन्यथा जिवन एकांगी, एकतर्फी, निराशजनक जगावे लागते. "नातेसंबंधांच्या प्रेमयुक्त गुंफू फुलांच्या माळा" असे नवोदित गित गात जीवन जगण्यात जो, आनंद आहे तो,नातेसंबंधांचा चुका शोधण्यात नाही. जीवन सुंदर आहे ते, अधिक सुंदर करू या, जीवनाचा मार्ग सुखाकडे नेण्यासाठी दोषांना दुर करु या. दोष स्वभावाने दोषयुक्त जीवन जगण्यापेक्षा, दोषविरहित दोषांना दूर करू या, आनंदकारक, उत्साहवर्धक, सकारात्मकतेने जीवनाला सुंदर आकार देऊन जीवन सफल करू या.

$$ गोरख तावरे $$

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.