सद्गुण, सदभाव बाळगणारा, सकारात्मक पत्रकारिता करणारा मित्र देवदास मुळे
दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवदास मुळे, यांची गेल्या अठरा - वीस वर्षातील पत्रकारिता ही सकारात्मक पत्रकारिता आहे. कराड शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने, सकारात्मकदृष्ट्या लोकांना त्याचे अवलोकन व्हावे, यासाठी देवदास मुळे पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आले आहेत. असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करणे, बातमी कशी असावी, बातमीचा सोर्स कसा निर्माण करावा, बातमीचा फायदा समाजाला कसा झाला पाहिजे, याबद्दल ते सविस्तर विवेचन करीत असतात. शांत, संयमी व ओघवत्या भाषाशैलीचे व्यक्तिमत्त्व म्हणून देवदास मुळे यांच्याकडे पाहिले जात आहे.
पत्रकारितेच्या प्रारंभापासून देवदास मुळे, दैनिक तरुण भारतमध्ये काम करीत आहेत. हे त्यांचे वैशिष्टय़ म्हणता येईल. दैनदिन जीवनात, देवदास मुळे यांच्या अपेक्षा व स्वप्न फार मोठी नाहीत. जी स्वप्न आहेत, ती सत्यात उतरवण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा मार्गदर्शक, हितचिंतक म्हणून देवदास मुळे याच्याकडे पाहिले जात आहे. पत्रकारांसाठी कोणताही उपक्रम राबवायचा असेल, तर देवदास मुळे अग्रक्रमावर असतात. सकारात्मक पत्रकारिता करणारे पत्रकार व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा यथोचित सत्कार करावा. हा नेहमी देवदास मुळेचा आग्रह असतो. कराड शहर व तालुक्यात घडलेल्या घडामोडींचे सविस्तर वृत्त, छायाचित्रांसह पहिल्यांदा आपल्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी ते आग्रही असतात. कारण बातमीला न्याय मिळाला पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असतो. असो.
देवदास मुळे हा माझा स्नेहीमित्र असून त्याच्याबरोबर अनेक विषयांवर नेहमी चर्चा करीत असतो. एखादा विषय जटिल असेल, तर तो सोप्या पद्धतीने कसा मांडावा, यासाठी देवदास मुळे माझ्यासह सर्वांनाच मार्गदर्शन करीत असतो. चांगुलपणाचा सद्गुण, सदभाव बाळगणारा या पत्रकार मित्राला, शतायुष्य लाभो ! ही त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. . ! देवदास मुळे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने दैनिक लक्ष्मीपुत्र, प्रसारमाध्यम संपादक पत्रकार परिषद परिवाराच्यावतीने त्यांचे अभिष्टचिंतन. . .! तुम जियो हजारो साल, साल के दिन पचास हजार . . !
= गोरख तावरे, कराड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा