प्रीतिसंगम संगीत महोत्सवाने कराडकर तृप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कराड
- प्रसिध्द शास्ञीय गायक पं.कैवल्यकुमार व आलापिनी जोशी यांच्या सुरेल गायनाने व बासरीवादक एस.आकाश व व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर यांच्या अप्रतिम सादरीकरणाने रसिक तृप्त झाले.
कराड जिमखाना आयोजित प्रीतिसंगम संगीत महोत्सवाचे उद्घाटन ख्यातनाम शास्ञीय गायक पं.कैवल्यकुमार यांच्या हस्ते संपन्न झाले. महोत्सवाच्या पं.कैवल्यकुमार यांचे सुरेल गायन झालेसुरवातीला त्यांनी "मारुबिहाग"रागातील विलंबित बंदिश सादर केली त्यानंतर 'सखी बीन बजाये' ही द्रुत बंदिश सादर केली.तसेच मुलतानी दादरा,शुरा मी वंदिले हे नाट्यगीत व 'येथे कारे उभा रामा' हा अभंग तसेच भैरवीतील 'होरी' गाउन उपस्थितांना मंञमुग्ध केले. तिन्ही सप्तकात लिलया संचार, सुरेख मींडकाम व अष्टांगप्रधान गायकी ही त्यांच्या गायन शैलीची वैशिष्ठ्ये रसिकांनी अनुभवली. त्यांना तबल्यावर हनुमंत फडतरे व संवादिनीवर सुरेश फडतरे यांनी सुरेख साथ दिली.
महोत्सवाच्या पहिल्या सञात कराडची उदयोन्मुख गायिका अलापिनी जोशी यांनी पुरीया कल्याण व मधुकंस हे राग अतिशय उत्तम सादर केले.दादरा राग व जोहार मायबाप हा अभंग सादर करुन मैफिल एका विशिष्ठ उंचीवर नेली.
दुसर्या सञात युवा बासरी वादक एस.आकाश व युवा व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांनी मालकंस रागात जुगलबंदी सादर करत रसिकांची मने जिंकली. हंसध्वनी या रागात 'झाला,तिहाई, व विविध लयकारी दर्शवित कार्यक्रमाचा परमोच्च बिंदु गाठला एस आकाश यांचे लयकारी अंग व यज्ञेश रायकर यांचे गायकी अंग यांचा अनोखा प्रीतिसंगम कराडकरांनी मनमुराद अनुभवला महोत्सवाची सांगता "अवघा रंग एक झाला " या भैरवीतील अभंग कु मधूरा किरपेकर यांनी बासरी व व्हायोलिनच्या साथीने अतिशय उत्तम सादर केला.तबल्यावर हनुमंत फडतरे,संवादिनीवर सुरेश फडतरे यांनी सुरेख साथ दिली तर आंतरराष्र्टीय दर्जाचे पखवाज वादक सुखद मुंडे यांच्या वादनाने कार्यक्रमाला आगळीच रंगत आणली.
स्वागत व सुञसंचिलन जन.सेक्रेटरी सुधीर एकांडे यांनी केले,प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्रकुमार शाह यांनी केले,कलाकारांची ओळख सौ. शुभांगी हुद्दार,दिलिप आगाशे व मधुरा किरपेकर यांनी करुन दिली तर आभार प्रमोद गरगटे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा