विकृत व आंधळे भक्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्रातील एक जाणता राजा शरदचंद्र पवार यांची महामुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच घेतली. या महामुलाखतीबाबत मुलाखत होण्यापूर्वी मुलाखत झाल्यानंतर बरीच चर्चा सुरू आहे. शरद पवार अन् राज ठाकरे हे वेगवेगळया पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक नेत्याचा समर्थक आपल्या नेत्याने कशी समर्पक उत्तरे दिली. याबाबत बोलत आहेत तर, आमच्या नेत्याने कसे खोचक प्रश्न विचारले याबाबत खुशमस्करी केली जात आहे.
दरम्यान सध्या राज्यात व केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपभक्त व मोदीभक्त या मुलाखतींबाबत टिंगलटवाळी करीत आहेत. भक्तांची भाषा व भक्तांची अक्कल पाजळने पाहिल्यानंतर त्यांना जोड्याने मारावे अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना निर्माण होत आहे. आदरणीय शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान दिले आहे. याचा विसर या आंधळय़ा भक्तांना पडलेला दिसतो. वास्तविक पाहता आपल्यापेक्षा मोठे व जेष्ठांचा सन्मान करावा, ही आपली संस्कृती आहे. मात्र अलीकडच्या काळातील भक्तांचे आंधळे प्रेम वाढले आहे. इतरांचा सन्मान करावा, अशी त्यांची भावनाच राहिलेली नाही. बापाच्या वयाच्या व्यक्तीला वाटले तसे बोलतात, ही संस्कृती नव्हे तर, विकृती आहे. घरात कुणी कवडीची किंमत देत नाही, गावात हिंगलावून कोण विचारीत नाही ? असे महाभाग राष्ट्रीय व राज्यस्तरावरील नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर विकृतीचे गरळ ओकत असतात.
आपल्याला आवडणाऱ्या राजकीय पक्षावर व नेत्यांवर निस्सीम प्रेम जरूर करावे. परंतु विरोधातील राजकीय पक्षावर व नेत्यांवर कोणत्या भाषेत टिंगलटवाळी करावी एवढे भान राखले पाहिजे. ज्यांच्या बाजूने आपण बोलत असतो ते आपल्या कधीही व्यक्तिगत मदतीला येत नाहीत. इतरांच्यावर टीका - टिप्पणी करायला हरकत नाही. मात्र पातळी सोडता उपयोगाची नाही. म्हणूनच हे सांगावेसे वाटते. ज्येष्ठांवर अतिरेकपणे वाट्टेल ते, खुशमस्करी आणि अपमानकारक मेसेज सोशल मीडियावर टाकले जातात. त्याचबरोबर सामान्य माणसाचे, सामान्य जीवनावरही टिंगलटवाळी करणे योग्य नाही. आवडत्या राजकीय पक्षांची व नेत्यांची चाटुगिरी करावी, परंतु इतरांच्यावर शिंतोडे उडवताना विचार हा केलाच पाहिजे, हा अट्टाहास मात्र सर्वांचाच आहे. दीर्घकाळ सत्ता भोगणाऱ्यांना सामान्य नागरिकाने कस्पटासमान फेकून दिले, तुम्ही तर चार वर्षांचे सत्तेचे धनी आहात ! सामान्य नागरिकांनी आपली ताकत दाखवल्यानंतर, तुमच्या तोंडालाच नव्हे, तर कुठे कुठे फेस येईल हे पाहावे लागेल.
तेव्हा तुमच्या हातामध्ये स्मार्टफोन जरूर आहे. पण तुम्ही त्या लायकीचे स्मार्ट आहात का ? हे पहिल्यांदा तपासून पाहा ! तेव्हा धोबी का कुत्ता, ना घर का ना घाट का, अशी अवस्था लवकरच आल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र सत्य आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा