विरोधकांचा राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न. . . ! लोकसभा निडवणुक लढवणार ही अफवा - डॉ. अतुल भोसले
कराड ( लक्ष्मीपुत्र ) - आगामी लोकसभा निडवणुक डॉ. अतुल भोसले लढवणार नाहीत, तर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात त्यांनी विकास कामे केली आहेत, त्यावर परिणाम व्हावा. म्हणून विरोधकांनी अफवा पसरवली आहे. असा खुलासा करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध युवानेते डॉ अतुल भोसले यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार नाही, याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात विकासकामांचा धडाका लावलेला आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी मतदारसंघांमध्ये सक्षमपणे केली आहे. यामुळे कराड दक्षिण मतदार संघातील जनतेचा पक्षावरील विश्वास दृढ होत आहे.
या विकासकामांचा दृश्यपरिणामांमुळे विरोधकांना पोटशूळ उठल्याने विरोधकांचा राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांनी हेतुपुरस्सर आज लोकसभेच्या उमेदवाराविषयी काही चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित केल्या आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. असा खुलासा डॉ. अतुल भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसारित करण्यात आला आहे.
भाजपचे चिटणीस डॉ. अतुल भोसले हे सातारा लोकसभा निवडणूक उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढवणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

त्यांच्या विरोधात कुणीही उभे राहीले तर काय फरक पडणार? भाजप तर्फे प्रत्यक्ष मोदी जरी उभे राहीले तरी सुद्धा राष्ट्रवादीचे खा.उदयन राजे सहज निवडून येतील.
उत्तर द्याहटवा