प्रत्येकाने ज्ञानापर्यंत आले पाहिजे - वेणूधारीदास महाराज शेरे येथे ज्ञानदिप ग्रंथालयाचे उदघाटन.


कराड, -  प्रत्येक गोष्ट ही कालांतराने नष्ट होते. परंतु ज्ञान घेत नाही तोपर्यंत ते नष्ट होत नाही. ज्ञानातून अज्ञान नाहिसे करण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानापर्यंत आले पाहिजे. असे मत पालघरचे वेणूधारीदास महाराज यांनी व्यक्त केले. 

शेरे (ता. कराड) येथे महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघ प्रेरित ज्ञानदिप मोफत ग्रंथालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. युवकमित्र बंडातात्या कराडकर अध्यक्षस्थानी होते.

 वेणूधारीदास महाराज म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमीत भागवत भक्तीचा उगम आहे. त्या भक्तीला आपल्या हृदयामध्ये स्थान द्या. ज्ञानदिप ग्रंथालयामधील ग्रंथसंपदेतून नव्या पिढीला वाचनाबाबत ऋची निर्माण होईल. जीवनाच्या उध्दारासाठी गीता व भागवताचे अध्ययन करावे. त्याचबरोबर संस्कृती टिकवण्यासाठी ज्ञान घेणे गरजेचे आहे. 

बंडातात्या म्हणाले, एक होता कार्व्हर वाचल्यानंतर जीवनातील अभिमान वाढतो. हे पुस्तक युवा पिढीने वाचावे. यामुळे आपल्या कामात केलेली निंदा व वंदा अशी कोणतीही खंत वाटत नाही. ज्ञानदिपच्या माध्यमातून ज्ञानाचे दालन उघडले आहे. 

बाळासाहेब उर्फ माऊली निकम यांनी सूत्रसंचालन केले. व प्रदिप निकम यांनी आभार मानले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.