गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐक्य वाढवावे - आमदार बाळासाहेब पाटील
कराड - आपआपसांतील मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐक्य वाढवावे, असे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मरळी (ता.कराड) येथील विविध विकास कामांच्या भूमिपुजन आणि उद्घाटन प्रसंगी केले.
मरळी (चोरे) ता.कराड येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने डोंगरी विकास निधीमधून अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन आणि जोतिबा मंदिरासमोरील सभामंडपाचे उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य देवराजदादा पाटील, जि.प.सदस्या सुरेखा जाधव, पचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ जाधव, मानसिंगराव मोहिते, संजय कदम, जयवंतराव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या केन्द्र व राज्य सरकार सवंग लोकप्रियतेसाठी अनेक फसव्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करीत असून साध्या साध्या गोष्टींसाठी जनतेस वेठीस धरले जात आहे. विकास हि सातत्याने चालणारी प्रकि‘या असून त्यासाठी गावांने आपआपसामधील मतभेद बाजूला ठेवून एकसंघ राहणे आवश्यक आहे, या गावाने नेहमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, पी.डी.पाटीलसाहेब यांच्या विचारांना पाठबळ दिलेले आहे, सह्याद्रि कारखान्याच्या माध्यमातून पाणंद रस्त्याची सुधारणा करण्यात आली. सध्याचे सरकार हे पाश्चिम महाराष्ट्रातील विकासा विरोधी आहे, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे, कर्जमाङ्गीसाठी शिवाजी महाराजांचे नाव देवून जाचक अटीतून लाभ न देण्याचा कुटील डाव हे सरकार करीत आहे, कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन लवकर दिली जात नाहीत, चोरे-मरळी या डोंगरी परीसरात १०० मीटर उंची पर्यंत पाणी पोहच करण्यासाठी उपसा सिंचन योजना व्हावी; यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी गावामध्ये एकी ठेवावी यामुळे गावचा विकास होण्यास मदत होईल, असे मत आ.बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. आपण सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी रहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
देवराज पाटील म्हणाले की, यापूर्वी चोरे, चोरजवाडी परिसराचा विकास बाबासाहेब चोरेकरांच्या प्रयत्नातून झाला. तद्नंतर स्व.पी.डी.पाटीलसाहेबांनी या परिसरात पाणी मिळण्याच्या हेतूने पाल व इंदोली उपसासिंचन योजना मार्गी लावण्यासाठी शासनाकडे मागणी केली त्याचा पाठपुरावा आमदार श्री.बाळासाहेब पाटील यांनी केला. या योजनेचे उद्घाटन दोन वर्षापुर्वी माजी उपमु‘यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतू ५० मीटर उंचीमध्ये हा परीसर बागायत होवू शकत नाही. यासाठी १०० मीटर उंचीपर्यंत पाणी पोहचणे गरजेचे आहे. परंतू सत्ताधारी सरकार हे शेतकरी विरोधी आहे, यासाठी आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी ठाम उभे रहावे असे आवाहन केले.
जयवंतराव साळुंखे यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भागाचा विकास झाल्याचे नमुद केले. संजय कदम यांनी पाल पासूनचा पश्चिम भाग पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना १०० मीटर पर्यंत पाणी देण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील प्रयत्नशील आहेत असे मनोगतात व्यक्त केले.
सुत्रसंचालन शंकर कुंभार यांनी व प्रास्ताविक भास्कर कुंभार यांनी केले. आभार राजेंद्र नांगरे यांनी मानले. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक भास्करराव गोरे, पै.संजय थोरात, डी.बी.जाधव, संजय जगदाळे, माजी संचालक संजय कदम, सरपंच पांडुरंग सावंत, उपसरपंच सौ.तारूबाई सुतार, माजी सरपंच बाळासाो कुंभार, भास्कर कुंभार, शंकर कुंभार, दिपक पडवळ, प्रकाश पिसाळ, मरळी विकास सोसायटीचे चेअरमन राजाराम नलवडे, व्हा.चेअरमन हिम्मत पाटील, उद्धवराव ङ्गाळके, रघुनाथ सावंत, संदिप काटे, संजय सावंत, बाळासाो जगताप, माजी चेअरमन प्रकाश जाधव, सज्जन डांगे, महम्मद मुलाणी, संपत पाटील, शामराव सावंत, आनंदराव जगताप, मुकुंद लादे, शहाजी डांगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धनाजी डांगे, आनंदराव जगताप, राजेंद्र नांगरे, अशोक सावंत, दत्तात्रय कळंबेकर उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा