महिलांनी स्‍वच्‍छ सर्वेक्षणासाठी पुढाकार घ्‍यावा

कराड -  स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2018 या स्‍पर्धेत कराडकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर कराडमधील महिलांनी स्‍वच्‍छ सर्वेक्षणासाठी पुढाकार घ्‍यावा असे आवाहान नगराध्‍यक्षा रोहिणी शिंदे केले.

नगरपरिषदेच्‍या महिला व बालकल्‍याण विभागामार्फत महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ व वाण वाटप कार्यक्रम संपन्‍न झाला. नगरपरिषद शाळा क्रमांक 3 मध्‍ये कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कराड  शहरातील महिलांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.

नगरपरिषदेमार्फत संक्रांत सणाचे औचित्‍य साधून कार्यक्रम घेतला जातो. यावर्षी कार्यक्रमावर स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2018 च्‍या स्‍पर्धेची छाप होती. कार्यक्रमाची सुरवात नगराध्‍यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्‍याण समिती सभापती आशा मुळे व सर्व उपस्थित नगरसेविकांच्‍या हस्‍ते दिपप्रज्‍वलन करुन झाली. यावेळी महिलांना हळदी कूंकू,तिळगुळ व वाण म्‍हणून कापडी पिशव्‍यांचे वाटप करण्‍यात आले. नगराध्‍यक्षा रोहिणी शिंदे, महिला व बालकल्‍याण सभापती आशा मुळे, माजी सभापती स्मिता हुलवान, राजेंद्र यादव यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

बांधकाम समिती सभापती हणमंत पवार,पाणी पुरवठा सभापती अरुणा पाटील,आरोग्‍य समिती सभापती प्रियांका यादव यांचेसह नगरसेविका सौ.विदया पावसकर, अंजली कुंभार, अर्चना ढेकळे, सुप्रीया खराडे, माया भोसले, सुनंदा शिंदे, मिनाज पटवेकर, अनिता पवार यांचेसह कराड नगरपरिषदेमधील सर्व महिला कर्मचारी वर्ग तसेच नागरी आरोग्‍य केंद्राच्‍या सर्व स्‍वयंसेविका व शाळा क्रमांक 3 व शाळा क्रमांक 8 मधील सर्व शिक्षीका, मदतनिस महिला आदी उपस्थित होत्‍या कार्यक्रम यशस्‍वी होणेसाठी उपनगराध्‍यक्ष जयवंतराव पाटील,मुख्‍याधिकारी यशवंत डांगे यांचेसह समूपदेशन अधिकारी दिपाली दिवटे, मुख्‍या‍ध्‍यापक अर्जून कोळी यांनी विशेष सहायय केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.