चांगला विचार


समाजामध्ये विविध स्वभावाचे, मानसिकतेचे व विचाराचे लोक असतात. प्रत्येक जण स्वहित पाहिल्यानंतर समाजहिताचा विचार करीत असतात. आपण समाजासाठी काम करतो आणि समाजामध्ये आपली ओळख निर्माण व्हावी, आपल्या नावाचा गौरव व्हावा, यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असतो. काही समाजसेवक निस्वार्थीपणे काम करतात तर काही वक्ते मानधन घेऊन समाज प्रबोधनाची चळवळ करीत असतात. दोघांचा हेतू एकच असतो की समाजामध्ये चांगुलपणा वाढावा. परंतु समाजामधील काही लोक मानधन घेऊन प्रबोधन करणारेबाबत टिका टिप्पणी करतात. काही प्रसंगी निस्वार्थीपणे काम करणारेही टीकेपासून सुटत नाहीत. “आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.” समाजामध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी सुरू असलेला खटाटोप पाहिल्यानंतर, समाज आपणाकडे कोणत्या नजरेने पाहतो, याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. समाजामध्ये विकृती असणारे लोक हे चांगले काम करणाऱ्यावर टीका करतात मात्र, चांगले विचार जपणाऱ्या लोकांनी कौतुक केले पाहिजे. ही रास्त अपेक्षा बाळगणे गैर नाही. समाजामध्ये आपली ओळख सद्गुणी, चांगला, प्रामाणिक, हितचिंतक अशी निर्माण झाली पाहिजे. कारण समाजाच्या दृष्टीने सर्वच चांगले आणि सर्वच नालायक अशी व्यक्ती असू शकत नाही. चांगुलपणाच्या कसोटीला उतरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष केलाच पाहिजे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मनाला पटेल, मनाला रुचेल अशीच कृती प्रत्येकाने केली पाहिजे. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक तयार केले आहेत. यामध्ये मनुष्य स्वभावाचे विविध पैलू प्रकट झाले आहेत. महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, यामुळे संतांचे सद्वविचार घेऊन समाजामध्ये काम केल्यानंतर, समाज कौतुक करेल आणि आपल्या मनालाही समाधान मिळेल. तेव्हा चांगुलपणाा सद्वविचार घेऊन समाजामध्ये, चांगले काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची समाजामध्ये चांगली ओळख निर्माण होते.      
$ गोरख तावरे $

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.