मित्रांच्या घोळक्यातील परममित्र विलास जाधवचे अभिष्टचिंतन. . . . ! ( 9823335544)
आमचा बालपणापासूनचा परममित्र विलास बजरंग जाधव याचा आज वाढदिवस. यानिमित्ताने परममित्र विलास जाधव यांच्या स्वभाववैशिष्ट संबंधाने थोडेसे चार शब्द . . . .गोरख तावरे
विलास जाधव, सुभाष होगाडे,दादा उर्फ एकनाथ तावरे यानी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या तिघांचे एकत्रित झाले आहे. त्रिमूर्ती म्हणून तीन मित्रांचा गौरव केला जातो. मित्र असावेत तर असे, हे अभिमानाने सांगितले जाते. एकमेकांच्या सुखदु:खाला हे मित्र एकत्रित असतात. विलास बजरंग जाधव याला कौटुंबिक सुसंस्कृत पार्श्वभूमी आहे. जाधव कुटुंबीयांना राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा आहे. माजी नगराध्यक्ष स्वर्गीय जयवंतराव जाधव व युवानेते अरुण जाधव यांचा विलास हा चुलत भाऊ आहे. विलास जाधव याला वाचनाची प्रचंड आवड आहे. दररोज किमान पाच ते सात दैनिकांचे वाचन तो करीत असतो. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आपल्या घरातील उमेदवाराच्या प्रचारात विलास जाधव सक्रिय सहभाग घेत असतो. उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभागामध्ये प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन, आपल्या कुटुंबाचा व उमेदवारांबाबत सकारात्मक प्रचार करीत असतो. नगरपालिका निवडणुकापुरताच राजकारणात विलास जाधव सक्रिय सहभाग घेतो. यानंतर नगरपालिका राजकारणाकडे पाहत नाही. निवडणुका होऊन निकाल लागला कि, दैनंदिन आपल्या उद्योगांमध्ये विलास जाधव सक्रिय होतो.
आमच्या बारा मित्रांमधील विलास जाधव हा एक हास्य विनोदामध्ये खळखळून हसत सहभागी होणारा परममित्र आहे. कोणाच्याही व्यक्तिगत व्यंगांवर हास्यविनोद करू नये, असा नेहमी विलास जाधवचा अट्टाहास असतो. वाचनात मग्न होणारा, निसर्गात रमणारा, हास्यविनोदात खळखळून हसणारा, आणि तितकाच तापट स्वभावाचा विलास जाधव आमचा मित्र आहे. मित्रांसोबत नेहमी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याचा आग्रह करणारा आणि मित्रांचे सहकुटुंबासह स्वतःच्या कुटुंबाचे सहलीचे नियोजन करणारा, विलास जाधव लग्नाचा वाढदिवस चार - पाच दिवस बाहेरगावी फिरायला जात असतो. दरम्यान स्वतःचा वाढदिवस धुमधडाक्यात करावा. असे त्याला कधीही मनापासून वाटत नाही. नेहमी मित्रांच्या घोळक्यात राहुल, इतरांचे विचार एकाग्रचित्ताने ऐकणारा, विलास जाधव यांचा आज वाढदिवस आहे. विलास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला उत्तम आरोग्य लाभो, सुख, समाधान, शांततामय सहजीवनासाठी विलास जाधव याला परमेश्वराने दीर्घायुष्य द्यावे. असे शुभचिंतन व्यक्त करतो. विलास जाधवच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. . . . !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा