आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वाघेरी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन


 कराड - वाघेरी (ता.कराड) येथे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून व निधीमधून पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कराड-उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते ९/२/२०१८ रोजी सायं ५:३० वाजता होणार आहे.


सदर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी कराड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य देवराजदादा पाटील हे राहणार असून, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीच्या सभापती सौ.शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, पंचायत समिती सदस्य सुहास बोराटे, माजी सदस्य बाळासाहेब सुर्यवंशी, अशेाकराव पाटील-पार्लेकर, संजय जगदाळे, पै.संजय थोरात, डी.बी. जाधव, माणिकराव पाटील, कराड कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दाजी पवार, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, ऍड.चंद्रकांत कदम, गोपाळराव धेाकटे, किशोर पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता पी. डी. कदम, कराड उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. आर. माने, मंडल कृषी अधिकारी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी सदर कार्यक‘मास विभागातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तसेच विविध कार्यकारी सेवासोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाघेरी येथील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.