शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल,हुपरी विद्यालयाने विद्यार्थ्यांना दिले मोफत लर्निंग अॅप

हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - सध्या लॉकडाउन मुळे शाळा व कॉलेज बंद आहेत.पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, आणि मुले घरात बसून कंटाळलेली आहेत.अश्या परिस्थितीत मात्र रयत शिक्षण संस्थेच्या शांता रामकृष्ण दातार इंग्लिश स्कूल, हुपरी या विद्यालयाने विद्यार्थ्यांना घरबसल्या आनंददायी शिक्षण देण्याचे ध्येय अंगिकारले आहे.
विद्यालयाने अँड्रॉईड फोनच्या माध्यमातून दररोज ऑनलाईन चाचणी घेऊन मुलांच्या बुध्दीला खाद्य देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.विद्यालयातील सर्व वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअॅपचे ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपवरुन विद्यार्थ्यांची दररोज ऑनलाईन चाचणी घेतली जाते.ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉईड फोन नाहीत ते विद्यार्थी शेजारी कोणाचा स्मार्टफोन असेल तर त्याचा उपयोग करतात.
रयत शताब्दी वर्षानिमित्त विद्यालयाने नवनीत प्रकाशनने तयार केलेले टॉप स्कोरर लर्निंग अॅपविद्यार्थ्यांना मोफत देण्याचे ठरवले आहे.त्याची किंमत प्रत्येकी 2000 रु. इतकी आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशनचे काम विद्यालयात युद्धपातळीवर सुरू आहे. जे विद्यार्थी या विद्यालयात नवीन प्रवेश घेतील अश्या विद्यार्थ्यांना देखील हे अॅप मोफत मिळणार आहे.
या कामी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा. नानासाहेब गाट, मा. मानसिंग देसाई, मा. सुरेश इंग्रोळे यांच्या बरोबर ग्रामस्थ, पालक,शिक्षक, विद्यार्थी यांचेही सहकार्य मिळत असल्याचे मुख्याध्यापक श्री.चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.या उपक्रमाची चर्चा सध्या हुपरी परिसरात सुरू आहे.
एकंदरीत, लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यालयाने केलेला हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

छान आहे. तुम्ही सर्वांनी हा छान उपक्रम राबवित आहात त्या साठी आमच्या कडुन धन्यवाद
उत्तर द्याहटवा